Pune Crime News | भररस्त्यात महिलेला मारहाण करुन विनयभंग, गुलटेकडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विवाहित महिलेचा पाठलाग करुन तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने बोलण्यास नकार दिल्याने तिला भररस्त्यात कानशिलात मारून तिचा विनयभंग (Molestation Case) केला. ही घटना सोमवारी (दि.23) घडली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत 30 वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरेश बदरीनाथ राठोड Naresh Badrinath Rathod (वय-40 रा. औद्योगिक वसाहत, पुणे) याच्यावर आयपीसी 354ड, 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मिनाताई ठाकरे वसाहत ते टिळक विद्यापीठ रोड पर्यंत गुलटेकडी येथे घडला. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश राठोड हा पीडित महिलेचा ऑगस्ट 2023 पासून पाठलाग करत होता.
तसेच स्त्री मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य करत होता. मात्र, फिर्यादी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
सोमवारी फिर्यादी या त्यांच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. त्यावेळी देखील आरोपीने त्यांचा पाठलाग
करुन बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी यांनी बोलण्यास नकार दिला असता आरोपीने फिर्यादी यांच्या
कानशिलात लगावली. पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | उद्या मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णयाची शक्यता कमीच, फडणवीसांचे संकेत; म्हणाले…

Pune Water Supply News | पुण्यातील काही भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद

MCA Joins Hands With Punit Balan Group | एमसीएचा महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाला चालना देण्यासाठी पुनित बालन ग्रुपसोबत करार

Nana Patole On Maharashtra Shinde Fadnavis Pawar Govt | सरकारमधील मंत्री बोलतात एक आणि दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देतात, आरक्षणावरून नाना पटोलेंची टीका

MCA Joins Hands With Punit Balan Group | एमसीएचा महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाला चालना देण्यासाठी पुनित बालन ग्रुपसोबत करार