Pune Crime News | तरुणाला अर्धनग्न करुन बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांवर FIR; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बदनामी करत असल्याच्या संशयावरून तरुणाला शिवीगाळ करत अर्धनग्न (Half Naked) करुन बेदम मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. तसेच या मारहाणीचा व्हिडीओ पीडित तरुणाच्या ओळखीच्या लोकांना पाठवला. याप्रकरणी पीडित तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) रविवारी (दि.20) फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

राहुल व्यवहारे (Rahul Vyavahare) व शिवशंकर कडू (Shivshankar Kadu) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 28 वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 323, 500, 504. 506 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 14 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळच्या सुमारास लक्ष्मीनारायण मंदिराजवळ घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल आणि शिवशंकर यांना फिर्यादी हा आपली
बदनामी (Defamation) करतो असा संशय होता.
याच कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांना अर्धनग्न करुन मारहाण केली.
तसेच यापुढे इव्हेन्ट करायचा नाही असे सांगून जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली.
आरोपींनी अर्धनग्न अवस्थेत मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो फिर्यादीच्या क्षेत्रातील लोकांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीशकुमार दिघावकर (PI Girish Kumar Dighavkar) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On Katraj Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा ! वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने 125 वॉर्डनची नियुक्ती करा!

Pune Crime News | पुण्यातील फार्म हाऊसवर सापडले बिबट्याचे अवयव, दोन बड्या उद्योजकांवर FIR

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक, 1 कोटी 16 लाखांचे अफीम जप्त

2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा