Pune Crime News | पुण्यातील फार्म हाऊसवर सापडले बिबट्याचे अवयव, दोन बड्या उद्योजकांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वन्य प्राण्यांची शिकार (Hunting of Wild Animals) करणे कायद्याने गुन्हा असताना बिबट्या सदृष्य प्राण्याची शिकार करुन त्याचे अवयव फार्म हाऊसमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) खडकवासला धरणालगत (Khadakwasla Dam) मांडवी बुद्रुक येथील फार्म हाऊसवर उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील दोन बड्या उद्योजकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

विश्वजीत जाधव (Vishwajeet Jadhav) व अभिजित जाधव (Abhijeet Jadhav) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम (Wildlife Protection Act) 1972 व भारतीय वन अधिनियम (Indian Forest Act) 1927 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल मालकाच्या मुलीने वनविभागाला (Forest Department) माहिती दिली होती. आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. (Pune Crime News)

खडकवासला धरणालगत असलेल्या मांडवी खुर्द गावाच्या हद्दीतील शेट्टी फार्म हाऊसमध्ये (Shetty Farm House) बिबट्याची शिकार (Leopard) करुन त्याचे अवयव लपवून ठेवल्याची माहिती पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल चालकाच्या मुलीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दिपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाळी भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन संकपाळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शेट्टी फार्म हाऊसवर छापा टाकला.

पथकाने फार्म हाऊसची तपासणी केली असता एका कपाटात बिबट्या सदृष्य प्राण्याची नखे तसेच पंजा लपवून
ठेवल्याचे आढळून आले. पथकाने परिसरात इतर ठिकाणी पाहणी केली. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राण्याचे
इतर कोणतेही अवयव सापडले नाहीत. याप्रकरणी विश्वजीत जाधव आणि अभिजित जाधव यांच्यावर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘यापुढे पत्नीशिवाय कार्यक्रमाला यायचं नाही’, पालकमंत्र्यांची पोलीस आयुक्तांना प्रेमळ तंबी (व्हिडीओ)

Pune Mahavitaran News | पुणे परिमंडलातील 1670 ग्राहकांना अवघ्या 24 ते 48 तासांत वीजजोडण्या