Pune Crime News | ‘इंस्टा’वर अश्लील भाषेत शिवीगाळ ! क्लासला जाणार्‍या 21 वर्षीय तरूणीचा पाठलाग करून विनयभंग; 31 वर्षीय युवकावर येरवडयात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | क्लासला जात असताना तरुणीचा पाठलाग करुन तीला इन्स्टाग्रामवर (Instagram) अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) 31 वर्षाच्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2017 पासून वारंवार घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 23 वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमित बिस्ट (वय-31) याच्यावर आयपीसी 354 (ड), 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या 2017 मध्ये क्लासला जात असताना आरोपी अमित याने त्यांच्यावर पाळत ठेवून वेळोवेळी पाठलाग केला. यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या इन्स्टाग्रामवर मेसेज करुन अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नांगरे (PSI Nangare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्याचा आईचा आनंद क्षणात दु:खात बदलला, अर्ध्यावाटेतच मुलाने घेतला जगाचा निरोप; बारामतीमधील दुर्दैवी घटना

Rohit Pawar on Ajit Pawar | ‘आत्मक्लेश करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाणांच्या छायाचित्रासमोर बसा!’, रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

08 October Ka Rashifal : मेष, वृषभ आणि मिथुन राशीवाल्यांना मिळेल चांगली डील, वाचा दैनिक भविष्य