Pune Crime News | महिलेचा विनयभंग करुन पतीला शिवीगाळ, हडपसरमधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मोबाईल शॉपी दुकानातील कामगाराने महिलेचा विनयभंग (Molestation Case) करून पतीला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.11) सायंकाळी सहाच्या सुमारास गाडीतळ बस स्टॉप परिसरातील एका मोबाईल शॉपी दुकानात घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत लोणी काळभोर येथे राहणाऱ्या 24 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे (Pune Police) तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बादल संजय होवाळे व तुपे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 354, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मंगळवारी गाडीतळ बस स्टॉप परिसरातील एका मोबाईल शॉपीमध्ये
मोबाईलला स्क्रीन गार्ड टाकण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दुकानात काम करणारा बादल होवाळे याने फिर्यादी यांना
अश्लील बोलून महिलेचा विनयभंग केला. महिलेने याबाबत पतीला फोन करुन सांगितले.
महिलेच्या पतीने दुकानात येऊन याबाबत जाब विचारला. त्यावेळी आरोपी बादल याने तुपे याला बोलावून घेतले.
तुपे याने महिलेच्या पतीला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदळे (API Kadale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाच घेताना महिला दुय्यम निबंधक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap On Two Police Officers | 1 लाख रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, पोलिस उपनिरीक्षक (PSI) देखील गोत्यात, 2 अधिकार्‍यावरील कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ

42 मुलांना सैन्यदलात नोकरी देण्याच्या आमिषाने 2 कोटींची फसवणूक, कोंढवा परिसातील प्रकार