Pune Crime News | नाव नोंदणीवरुन अभाविप आणि एसएफआयमध्ये राडा, पुणे विद्यापीठातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात (SPPU Campus) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना बुधवारी विद्यापीठाच्या भोजनगृहाजवळ घडली आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कर्यकर्ते जखमी झाले आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) धर्तीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष समोर आला आहे. (Pune Crime News )

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात SFI या संघटनेकडून विद्यापीठ संघटना सदस्य नोंदणी सुरु होती. त्यावेळी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. अभाविपने आमच्या सदस्य नोंदणीत अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. तर, अभाविपने एसएफआयचे कार्य़कर्ते जबरदस्तीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला आहे. (Pune Crime News)

नाव नोंदणीवरुन सुरु झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यात दोन्ही बाजूचे कार्य़कर्ते जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांकडून दोन्ही संघटनांची बाजू ऐकून घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठातील सुरक्षा विभागाने दिली आहे. मात्र या मारामारीमुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

https://x.com/sfimaha/status/1719675998999023863?s=20

https://x.com/ABVPVoice/status/1719647616735281634?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case News | मेडिकल दुकानदाराकडून लाच घेताना औषध निरीक्षकासह दोघे अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

अभ्यासक्रमातून काढल्याच्या रागातून इन्स्टिट्यूट चालकाला भोसकले, पुण्यातील जंगली महाराज रोडवरील घटना; आरोपी विद्यार्थ्याला अटक

बोनस मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार- कामगार नेते सुनील शिंदे

Sambhaji Raje Chhatrapati | छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला सुनावले,
मनोज जरांगेंची प्रकृती खालावतेय, हे बैठकांचा खेळ खेळतायंत

पुणे विद्यापीठात चोरी, चतु:श्रृंगी पोलिसांकडून चोरटा गजाआड

Dr Sagar Shelke Patil | पी.जोग एज्युकेशनल ट्रस्टच्या नव्याने सुरु झालेल्या विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य व संचालक पदी डॉ. सागर शेळके यांची निवड