Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन पळून गेलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक; दोन वर्षापासून होता फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचर करुन सामूहिक बलात्कार (Monir Girl Gang Rape Case) केल्याच्या प्रकरणात मागील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्याला हवेली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime News)

लक्ष्मण महादेव पाटील Laxman Mahadev Patil (वय-25 रा. मु.पो. डोणजे, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर 2021 मध्ये बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

आरोपी लक्ष्मण पाटील टिळक रोडवरील खजीना विहीर तालमी समोर येणार असल्याची माहिती कोंबिंग ऑपरेशन (Combing Operation) राबविताना पोलीस अंमलदार महेश पाटील व सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. हवेली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. हा गुन्हा त्याने इतर 4 ते 5 साथीदारांनी मिळून केल्याचे सांगितले. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला हवेली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik),अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक आयुक्त गुन्हे -1 सुनील तांबे (ACP Sunil Tambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर (Sr. PI Ashok Indalkar), पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख
(PSI Shahid Shaikh), पोलीस अंमलदार महेश पाटील, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, धनंजय ताजणे, गणेश ढगे,
मॅगी जाधव, प्रदीप राठोड, आजीनाथ येडे, रविंद्र लोखंडे, नारायण बनकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | इंदापूरात मराठा आंदोलकांच्या जलसमाधीने प्रशासनाची धावपळ, एक आंदोलक बुडाला पण सुदैवाने बचावला!

Pune Crime News | पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन खून, येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरातील घटना

Priyanka Chopra Glamorous Look | ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियाचा वाढवला पारा…!

Malaika Arora Bold Look | मलाइका अरोरानं घातला काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली उर्फी सोबत तुलना..