Maratha Reservation | इंदापूरात मराठा आंदोलकांच्या जलसमाधीने प्रशासनाची धावपळ, एक आंदोलक बुडाला पण सुदैवाने बचावला!

इंदापूर : Maratha Reservation | जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना समर्थन दर्शवण्यासाठी राज्यभरात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलने सुरू आहेत. इंदापूरमध्ये आज कळाशी, गंगावळण भागातील २० ते २२ आंदोलकांनी तब्बल २ तास भीमानदीत जलसमाधी घेतली. यामुळे पोलीस व प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले, आणि एकच धावपळ उडाली.

यावेळी जलसमाधीसाठी सर्व आंदोलकांनी भीमा नदीच्या पाण्यात काठापासून दोन सव्वादोन किलोमीटर अंतरावर जावून आंदोलन सुरु केले. यावेळी एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. (Maratha Reservation)

दरम्यान, हे आंदोलन सुरू असताना एका आंदोलकाची दमछाक झाल्याने तो बुडू लागला. त्याला बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर झाली.

प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीनंतर आंदोलक पाण्याबाहेर आले. दरम्यान, उपोषण सुरुच ठेवण्याचा
निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. या सर्व आंदोलना दरम्यान प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललितच्या जीवाला धोका असल्याचा वकिलांचा दावा ! ललित पाटीलला 7 नोव्हेंबर पर्य़ंत पोलीस कोठडी

Manoj Jarange Patil | सर्वपक्षीय बैठकीवरून जरांगे संतापले, ”अजून किती वेळ द्यायचा, फडणवीसांनी चर्चेला यावे, मराठे संरक्षण देतील”

Maratha Reservation | पुण्यात अजित पवार आणि उदय सामंतांचे बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले

Pune Crime News | नार्कोटिक्स विभागातून बोलत असल्याचे सांगून पुण्यातील युवकाची 10 लाखांची फसवणूक