Pune Crime News | 10 टक्के व्याजाने पैसे परत केल्यानंतरही धमकाविणार्‍या गुंडावर कारवाई

पुणे : Pune Crime News | व्यवसायासाठी १० टक्के व्याजाने ८ लाखांवर त्यांनी १४ लाख ७० हजार रुपये परत केले. तरीही अजून ११ लाख रुपयांची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) आनंद परशुराम धोत्रे (वय ३४, रा. शिवणे)याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोपरे गावातील एका ४१ वर्षाच्या नागरिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १८/२३) दिली आहे. हा प्रकार २७ डिसेबर २०१९ पासून सुरु होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आनंद धोत्रे याच्याकडून १० टक्के व्याजाने ८ लाख रुपये
घेतले होते. त्या मोबदल्यात धायरी येथील फिर्यादीचे २ फ्लॅटची नोटराजईज विसार पावती करुन दिली होती. या बदल्यात फिर्यादी यांनी रोख व ऑनलाईन स्वरुपात आरोपीला १४ लाख ७० हजार रुपये परत दिले आहेत. असे असताना आरोपी वारंवार फोन करुन अजून ११ लाख रुपयांची मागणी करीत आहे. ते न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Action taken against bully who threatens even after returning money with 10 percent interest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या