Pune Crime News | मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन– Pune Crime News | मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी (Bike Thief) विक्री करणाऱ्या तीन एजंट (Agent) यांना कोंढावा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 7 लाख रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 15 दुचाकी जप्त केल्या आहेत. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई बोपदेव घाटात केली आहे. (Pune Crime News )

निखील सुनिल राक्षे Nikhil Sunil Rakshe (रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड, पुणे), सागर शिवाजी गुंजले Sagar Shivaji Gunjale (रा. माण, सातारा), गणेश भरत मोहिते Ganesh Bharat Mohite (रा. माण, सातारा) असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. (Pune Crime News)

कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर तपास पथकाकडून पेट्रोलिंग करुन सीसीटीव्ही फुटेज चेक करुन वाहनांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी पोलीस अंमलदार विकास मरगळे, राहुल थोरात, जयदेव भोसले यांना माहिती मिळाळी की, निखील राक्षे याच्याकडे एक होंडा शाईन (Honda Shine) दुचाकी असुन त्याच्यावर नंबर प्लेट नाही. ही गाडी चोरीची असून ती विक्री करण्यासाठी बोपदेव घाट (Bopdev Ghat) या ठिकाणी जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपास पथकाने बोपदेव घाटात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ही दुचाकी त्याला महेश चव्हाण (Mahesh Chavan) नावाच्या व्यक्तीने चोरी करुन विक्री करण्यासाठी दिल्याची माहिती दिली. तसेच तो ही गाडी विक्री करण्यसाठी ग्राहकाचा शोध घेत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने महेश चव्हाण याने 2 बुलेट (Bullet), 2 यामाहा (Yamaha), 1 केटीएम (KTM), 3 युनिकॉर्न (Unicorn), 2 अॅक्टिव्हा (Activa), 1 शाईन अशा दुचाकी विक्रीसाठी दिल्याची माहिती दिली. या दुचाकी इंदापुर भागातील शेतकऱ्यांना कागदपत्रे नंतर देते असे सांगुन विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्यांकडून त्या जप्त केल्या आहेत.

आरोपीने चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी ग्राहक मिळेपर्यंत रोडलगत ठिकठिकाणी सोडल्या होत्या. त्या देखील दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपीने महेश चव्हाण याच्याकडून 11 चोरीच्या दुचाकी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून 5 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सागर शिवाजी गुंजले (रा. माण, सातारा) याच्याकडे 1 युनिकॉर्न, 2 पल्सर तसेच गणेश भरत मोहिते (रा. माण, सातारा) याच्याकडे 1 चोरीची स्प्लेंडर दुचाकी विक्री करण्यासाठी दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 7 लाख रुपये किंमतीच्या 15 दुचाकी जप्त केल्या आहेत.

अटक केलेल्या आरोपींकडून कोंढवा, वानवडी (Wanwadi Police Station), राजगड (Rajgad Police Station),
माणगाव (Mangaon Police Station), महाळुंगे (Mahalunge Police Station),
वाठार (Vathar Police Station), सासवड पोलीस ठाण्यातील (Saswad Police Station) 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.
तर एका दुचाकी बाबत अधिक तपास कोढवा पोलीस करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे (ACP Shahuraje Salve),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonwane),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले (PI Sandeep Bhosale),
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे (API Lekhaji Shinde),
सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील (API Dinesh Patil),
पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले, विकास मरगळे,
अभिजीत रत्नपारखी, शशांक खाडे, आशिष गरुड, रोहित पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड