Pune Crime News | एक कोटीचे दागिने घेऊन सोन्याच्या दुकानातील कर्मचारी पसार, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने एक कोटी 15 लाखांचे दागिने (Gold Jewellery) इतर व्यावसायिकांना विक्री न करता दागिने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.1) दुपारी साडेबारा वाजता रविवार पेठेतील सोन्याच्या दुकानात उघडकीस आली आहे. (Pune Crime News)

याबाबत जितेंद्र धनराज सोनिग्रा (वय-45 रा. मॅरिगोल्ड बिल्डींग, सॅलसबरी पार्क, मार्केटयार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) गुरुवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादी यांच्या दुकानातील सेल्समन विक्रम अमृतलाल बाफना Salesman Vikram Amritlal Bafna (रा. भिक्षु सदन, प्रेमकुमार शर्मा रोड, माधव बाग जवळ, गिरगाव, मुंबई) याच्याविरुद्ध आयापीसी 408, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सोनिग्रा यांचे रविवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. या ठिकाणी आरोपी विक्रम बाफना हा सेल्समन म्हणून कामाला आहे. फिर्यादी यांनी आरोपी बाफना याच्याकडे एक कोटी 15 लाख 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने शहरातील व्यापाऱ्यांकडे विक्री करण्यासाठी दिले होते. मात्र आरोपीने सोन्याची विक्री न करता ते सोने घेऊन पळून गेला. फिर्य़ादी यांनी आरोपीला 1990 ग्रॅम 100 मिलीग्रॅम वजनाचे 22 कॅरेट च्या 245 सोन्याच्या चैन विक्रीसाठी दिल्या होत्या. विक्रम बाफना याने सोन्याची विक्री न करता जितेंद्र सोनिग्रा यांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे (PSI Kale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Reservation | वेळ घ्या पण आरक्षण द्या, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ; जरांगे पाटलांनी उपोषण सोडले

Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील, अरविंदकुमार लोहरे यांच्यासह 14 जणांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 76 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA