पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 ने माळवाडीतील लक्ष्मी एन्क्लेव्ह जवळून एका अट्टल वाहन चोरास अटक केली आहे (Criminal Arrest In Motor Vehicle Theft). त्याच्याकडून वाहन चोरीचे तब्बल 8 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी (Pune Police) त्याच्याकडून 1 लाख 85 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime News)
मुजफ्फर रफिक पठाण Muzaffar Rafique Pathan (26, रा. मांजरी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 कडील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हे हडपसर आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार शिवाजी जाधव, राहुल इंगळे आणि संदिप येळे यांना एकजण चोरीच्या गाडीसह लक्ष्मी एन्क्लेव्ह जवळ उभा असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन आरोपी पठाणला अटक केली. (Pune Crime News)
त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात (Pune Police Crime Branch) आणल्यानंतर त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात आली. त्यावेळी हडपसर, विमाननगर आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एकुण 8 वाहने चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणले असून 1 लाख 85 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड (Sr PI Nandkumar Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाडवी (API Vivek Padavi), पोलिस अंमलदार उदय काळभोर, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, राहुल इंगळे आणि संदिप येळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | विश्रांतवाडी: टिंगरेनगरमध्ये वडिलाचा मुलाने केला खून
Jio Air Fiber launched in 8 cities including Pune | पुण्यासह 8 शहरांमध्ये जिओ एअर फायबर लाँच !
केबलशिवाय अल्ट्रा हाय स्पीड मिळणार
CM Eknath Shinde | ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना ! “सर्वसामान्यांना सुख,
समृध्दी मिळू दे”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे