Pune Crime News | धक्कादायक! पुणे पोलिसांनी अटक केलेला घुसखोर बांगलादेशी निघाला बॉम्ब स्फोटातील आरोपी, पुणे पोलिसांची कोर्टात माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांकडून (Pune Police) कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या नागरिकांमध्ये बॉम्ब स्फोटातील (Bomb Blast) आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कमरुल मंडल असे या आरोपीचे नाव असून त्याने बेनापोल, बांगलादेश याठिकणी बॉम्ब स्फोट केले होते. या प्रकरणी त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर भारतात घुसखोरी करुन तो पुण्यात वास्तव्य करत होता, अशी माहिती हडपसर पोलिसांनी न्यायालयात (Pune Court) दिली आहे. आरोपी मंडल याने पुण्यातून भारतीय पासपोर्ट तयार करुन घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. (Pune Crime News)

कमरुल मंडल याच्यासह इतर सहा संशयित बांगलादेशी घुसखोरांना 15 ऑगस्ट 2021 रोजी ताब्यात घेतले होते. त्यावेळी मंडल याने आपण बांगलादेशी असल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी स्टेशन डायरी मध्ये याबाबत नोंद केली. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास न करता हडपसर पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते.

दरम्यान, या प्रकरणात भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स Military Intelligence (एमआय) युनिट (सदर्न कमांड) ने लक्ष घातल्यानंतर हडपसर पोलिसांनी पुन्हा मंडल सह बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना 14 ऑक्टोबर रोजी अटक केली. तर इतर 11 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींना आधार, पॅन कार्ड यासारखे भारतीय ओळपत्र पुण्यातील एजंटने तयार करुन दिल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी कागदपत्र तयार करुन देणारा पुण्यातील एजंट शंकर उर्फ संग्राम नेकरामसिंग पवार Agent Shankar alias Sangram Nekram Singh Pawar (वय- 53, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मोहम्मदवाडी, पुणे) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहेत. (Pune Crime News)

तपासादरम्यान, अटक करण्यात आलेले बांगलादेशी आरोपी पश्चिम बंगाल येथील बँक खात्यातून बांगलादेशात पैसे
पाठवत असल्याचे समोर आले आहे. अंतरराष्ट्रीय धागेदोरे असणाऱ्या रॅकेटचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी
न्यालयात सांगितले. न्यायालयाने अटक केलेल्या पाच आरोपींना 23 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांनी माहिती घेतली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | क्रेडीट कार्डची गोपनीय चोरुन पुण्यातील बँकेच्या ग्राहकांची फसवणूक

ACB Trap News | लाच घेताना महावितरणच्या अभियंत्यासह लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात