Pune Crime News | बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन ती खरी असल्याचे भासवून नगर भूमापन कार्यालयात (City Survey Office) सादर करुन मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Pune Police) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 1998 ते आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत अशोक आनंद राजूरकर Ashok Anand Rajurkar (रा. सिताराम भवन, पुरंदरे रोड शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अरविंद शिवाजी चौगुले Arvind Shivaji Chaugule (रा. बालेवाडी, पुणे), कुमार हरिश्चंद्र यादव Kumar Harishchandra Yadav (रा. हडपसर) यांच्यावर आयपीसी 120(ब), 420, 465, 467, 468, 471, 472 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची शिवाजीनगर येथे 3144.40 चौरस मिटर मिळकत आहे.
आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या मिळकतीचे बनावट कागदपत्रे तयार केली.
यावर शासकीय अधिकारी यांच्या पदाचा बनावट गोल शिक्का मारला.
ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून ते नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल केली. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी यांची मिळकत हडप करण्याचा प्रयत्न करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार