Pune Pimpri Crime News | आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | आमची जमीन रस्त्यात गेली आहे. तू रस्त्याच्या कडेला भाजीचा धंदा करतोस याची तक्रार पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे (Encroachment Department) करेल, अशी धमकी देऊन महिलेने भाजी विक्रेत्याकडून (Vegetable Vendor) 40 हजार रुपयांची खंडणी (Extortion) वसूल केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (PCPC Police) महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत राजेश अशोक रांगोळे Rajesh Ashok Rangole (वय-25 रा. महादेव नगर, सुसगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन एका महिलेवर आयपीसी 384, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान सुसगाव कडे जाणाऱ्या रोडवरील मोहन नगर येथील महापालिकेच्या जागेवर घडला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने फिर्यादी राजेश यांच्या भाजीपाला विक्रीच्या हातगाडीवर येऊन तसेच फोन करुन खंडणीची मागणी केली. फिर्यादी हे त्यांची हातगाडी फुटपाथवर लावतात, त्यामुळे त्यांची तक्रार महापालिकेकडे करण्याची धमकी महिलेने दिली. तसेच आम्ही स्थानिक आहोत. आमच्या जमिनी रोडमध्ये गेल्या. त्यामुळे दररोज 500 रुपये द्यायचे. तरच येथे हातगाडी लावायची. अन्यथा तुझ्याकडे बघते, अशी धमकी दिली.

त्यानंतर महिलेने वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून 40 हजार रुपये खंडणी वसुल केली.
तसेच आणखी खंडणीची मागणी केली.
महिलेच्या त्रासाला वैतागून फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

भावाच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

दारु पिण्याच्या पैशावरून तरुणाचा खून, पुरंदर तालुक्यातील घटना