Pune Crime News | सोसायटीचा देखभाल खर्च मागितल्यामुळे चेअरमनच्या खूनाचा प्रयत्न; वारजे भागातील घटना; टोळक्यावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सोसायटीतील देखभाल दुरुस्ती खर्च मागितल्याचा वादातून टोळक्याने सोसायटीच्या चेअरमनवर कोयत्याने (Koyta) वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. टोळक्याने त्यांची पत्नी, आई आणि भावाला मारहाण (Beating) केली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. (Pune Crime News)

महादेव कसबे (वय ३५, रा. म्हाडा वसाहत, वारजे) असे गंभीर जखमी झालेल्या चेअरमनचे नाव आहे. अनिकेत बापू कसबे (Aniket Bapu Kasbe), ओमकार दिलीप जाधव (Omkar Dilip Jadhav), अनिल संजय जोगदंड (Anil Sanjay Jogdand), बुधल्या राठोड, अविनाश कांबळे, चंद्रकांत दादु (वय ५०, रा. म्हाडा वसाहत, वारजे – Mhada Colony Warje) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून चंद्रकांत दादु याला अटक केली आहे. ही घटना १ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव कसबे हे म्हाडा वसाहतीतील त्यांच्या इमारतीचे चेअरमन आहेत. इमारतीमध्ये मागील ८ ते १० दिवसांपासून लाईट व पाणी येत नसल्यामुळे फिर्यादी हे बिल्डींगचे मेन्टेनन्स फीसाठी रेश्मा जगताप यांच्या घरी गेले होते. त्यावेळी पाचव्या मजल्यावर राहणारे चंद्रकांत दादु व इतर पाच जणांनी फिर्यादी यांना आमचेकडे बिल्डींगचे मेंन्टेनन्स मागू नका असे म्हणून हातात कोयता घेऊन अनिकेत कसबे याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. कसबे यांची पत्नी, आई, भावाला टोळक्याने मारहाण केली. (Pune Crime News)

याविरोधात नंदा संजय जोगदंड यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६८/२३) दिली आहे. त्यानुसार महादु कसबे, शंकर कसबे, पप्पु कसबे, संजय कसबे (सर्व रा. म्हाडा वसाहत, वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. महादु कसबे यांनी फिर्यादीचे सासरे यांनी मेंटेनन्स देण्यास नकार दिला. पगार झाल्यानंतर मेंटेनन्स देतो, असे सांगितले. याचा राग मनात धरुन शंकर कसबे याने फिर्यादीचे सासर्‍यांना दगडाने नाकावर मानेवर मारहाण केली. महादु कसबे याने फिर्यादीचे मुलाला हातातील बांबुने मारण्यास येत असताना फिर्यादी यांनी अडविले असता त्यांच्या डोक्यात बांबु मारुन जखमी केले.

Web Title :   Pune Crime News | Attempted assassination of the chairman for demanding maintenance expenses of the society; Incidents in Warje area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा