Pune Crime News | ‘या’ मोठया आर्थिक घोटाळयात पहिल्यांदाच भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदाराचं नाव आलं प्रकाशझोतात, पुणे पोलिस घेताहेत युध्दपातळीवर शोध

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime News |बीएचआर (भाईचंद हिराचंद रायसोनी) bhaichand hirachand raisoni पतसंस्था घोटाळ्यात जळगाव BJP विधान परिषदेचे आमदार चांदुलाल पटेल (bjp mla chandulal patel) यांच्यावर गुन्हा दाखल असून, त्यांचा शोध पुणे पोलीस गेल्या पंधरा दिवसापासून घेत आहे. त्यांचं नाव आजच सर्वांसमोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. तर पुणे पोलिसांनी आम्ही त्यांचा शोध घेत असल्याचे म्हंटले आहे.  Pune Crime News | Bhaichand Hirachand Raisoni BJP MLA in the spotlight for the first time in the financial scam, Pune police are conducting a search on the battlefield

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर बीएचआर (bhaichand hirachand raisoni) प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाला आले आहे.
सध्या या प्रकरणात पोलीसांनी खोलपर्यंत धागेधोरे शोधले आहेत.
नोव्हेंबर 2020 मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी रंजना घोरपडे यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणारा तपास आता युद्ध पातळीवर सुरू झाला आहे.

दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपी समोर आले आहेत.
यात काही दिवसांपूर्वी 11 जणांना अटक केली होती.

नुकतीच या प्रकरणात (दि 29 जून) प्रमुख असलेला जितेंद्र गुलाबराव कंडारे (jintendra kandare) याला अटक केली आहे.
त्यानंतर या गुन्ह्याचा आणखी सखोल तपास सुरू झाला आहे.
कंडारेला मध्यप्रदेशच्या इंदूरमधून अटक केली होती.
जितेंद्र कंडारेला (jintendra kandare) शासनानेच बीएचआर प्रकरणात आवसायक म्हणून नेमणूक केली होती.

दरम्यान, आता याप्रकरणी आमदार चंदूलाल पटेल (bjp mlc mla chandulal patel) यांचे नाव समोर आले आहे.
गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तबल 15 जणांचे अटक वॉरंट घेऊन जळगावात गेले होते. त्यात आमदार पटेल यांचही अटक वॉरंट होत. पण, यावेळी ते पसार झाले.
त्यानंतर शोध घेत असताना कंडारेचा शोध लागला आणि त्याला अटक केली.
मात्र आमदार पटेल पसार झाले. त्यांचं लोकेशन इंदोर येथे आल्यानंतर पथक त्याही ठिकाणी गेले होते.
मात्र तेथून ते कारने पसार झाले. त्यानंतर त्यांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
आमदार पटेल यांच नाव समोर आल्याने मात्र जळगावसह राज्यात खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे जळगावमधील मोठ्या राजकीय नेत्यांची नावे जोडली जात होती.
त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Web Title : Pune Crime News | Bhaichand Hirachand Raisoni BJP MLA in the spotlight for the first time in the financial scam, Pune police are conducting a search on the battlefield

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Cabinet Expansion । राजीनाम्याच्या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Anti Corruption Bureau Pune | दौंड तालुक्यातील यवतमध्ये तलाठयास 30 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं पकडलं

Gopaisa | गोपैसाद्वारे ‘अर्नली’ या नवीन डील शेअरिंग प्लॅटफॉर्मची घोषणा