Pune Crime News | पिस्टल बाळगणारा अल्पवयीन मुलगा भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात; पिस्टल व काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून (Pune Police) बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन एक पिस्टल व तीन काडतुसे जप्त केली आहेत (Pistol Seized). पोलिसांनी आरोपीकडून 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.6) कात्रज येथे करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे यांना माहिती मिळाली की, कात्रज गावातील तलावाजवळील महादेवाच्या मंदिराजवळील शौचालयाजवळ एक अल्पवयीन मुलगा थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेऊन 50 हजार रुपयांचे पिस्टल आणि दीड हजार रुपये किंमतीचे 3 काडतुसे जप्त केली. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रदाशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शरद झिने,
सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता,
पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी,
मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, निलेश जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे,
चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा, आढळरावांनाही दिले आव्हान, ”स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा…”

Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची मागणी