Pune Crime News | पुण्यातील हॉटेल साई गार्डनवर पोलिसांची ‘रेड’, लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करत सुरू होतं ‘डांगडिंग’, 41 तळीरामांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune City) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करुन सुरु असलेल्या मद्य पार्टीवर पुणे पोलिसांनी (Pune Police) छापा Raid टाकून 41 तळीरांमाना दणका दिला आहे. पोलिसांनी पुण्यातील मांगडेवाडी येथील हॉटेल साई गार्डनवर छापा (Raid on Hotel Sai Garden) टाकून 41 मद्यपींवर कारवाई करून 7 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.5) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
शहरात कडक संचारबंदी (Curfew) असताना हॉटेल साई गार्डनमध्ये मद्य पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी 35 ते 40 व्यक्ती दारु पित व जेवण करताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेलचे मालक महेश लोणारे व गणेश घाटे यांच्यासह 39 मद्यपींना ताब्यात घेतले. तसेच 5740 रुपयांची दारु व रोख रक्कम, 25 दुचाकी, एक रिक्षा, एक चारचाकी असा एकूण 7 लाख 5 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पार्क केलेल्या गाड्यांमुळे बिंग फुटलं
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलीस अंमलदार विजय दुधाळे व शिंदे कात्रज परिसरात पेट्रोलिंग करत होते.
मांगडेवाडी फाटा येथील साई गार्डन या हॉटेल समोरील पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्क केलेल्या दिसल्या.
त्यांना संशय आल्याने आतमध्ये जाऊन पाहिले असता हॉटेलमध्ये काही लोक दारु पित बसले होते.

वरिष्ठांना तात्काळ माहिती
पोलिस अंमलादारांनी या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी तातडीने सहायक पोलीस निरीक्षक घावटे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी पाठवला.
पोलिसांनी छापा टाकून 41 जणांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी विजय दुधाळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार (Disaster Management Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील,
सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जी. डी घावटे, पवार, पोलीस अंमलदार श्रीधर पाटील, परशुराम पिसे, राजु वेगरे, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, प्रणव संपकाळ यांनी केली.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या