Pune Crime News | चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बिबवेवाडी परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या (Thieves) सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यातील 17 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, गुन्ह्यात वापरलेली बुलेट असा एकूण 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) 10 फेब्रुवारी रोजी केली.

 

आसिफ सलिम पटेल (वय-36 रा. आराध्यम सोसायटी, येवलेवाडी, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 5 फेब्रुवारी रोजी फिर्यादी महिला या पतीसोबत दुचाकीवरुन जात होत्या. त्यावेळी पासलकर चौकात पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने ओढून चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील (Bibvewadi Police Station) तपास पथक करत असताना पोलिसांनी संशयित व्यक्तींवर पाळत ठेवून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यची कबुली दिली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ही गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे करीत आहेत. (Pune Crime News)

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Purnima Taware)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव (Senior Police Inspector Sangita Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे (API Praveen Kalukhe), पोलीस अंमलदार राजेंद्र राऊत, संतोष जाधव,
प्रणय पाटील, अमोल नवले, सतिष मोरे, अभिषेक धुमाळ, ज्योतिष काळे, शिवाजी येवले, अतुल महांगडे यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Bibwewadi police arrest chain snatching inn criminal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा