Pune Crime News | अडीच कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डर गणेश कोंढरेला पोलीस कोठडी

पुणे : Pune Crime News | पुणे शहरात बांधकाम व्यवसायिकांकडून (Builders In Pune) नागरिकांच्या फसवणुकीच्या (Cheating Fraud Case) प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. यातच आता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर गणेश कोंढरे (Ganesh Kondhre Builder) यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bhrati Vidyapeeth Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष काशिनाथ सूर्यवंशी यांना बिल्डर गणेश कोंढरे यांच्याकडून आंबेगाव निपाणी वस्ती जांभुळवाडी रोड यांच्याकडून प्लॉटिंग संदर्भात माहिती मिळाली होती . त्यावेळी सुभाष सूर्यवंशी यांनी सदर फ्लॅाटमध्ये तीन गुंठे क्षेत्रफळ असलेला प्लॉट बुकिंग करण्याचे ठरवले त्यामध्ये एक गुंठ्याचा ९,००,०००/- प्रमाणे तीन गुंठेतील २७,००,०००/- असा व्यवहार ठरला होता.

दिनांक १७/०१/२०२१ रोजी ठरल्याप्रमाणे सुभाष सूर्यवंशी यांनी २२,०००/- रोख स्वरूपात देऊन प्लॉटची बुकिंग केली व त्यांना त्याबाबत पावती मिळाली. त्यानंतर सुभाष सूर्यवंशी यांनी गणेश कोंढरे जी के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने आजतागायत रक्कम २२,००,०००/- प्लॉटचे खरेदी करता दिली. त्यानंतर सुभाष सूर्यवंशी यांनी प्लॉट देण्यासाठी गणेश कोंढरे यांना त्याबाबत जाब विचारला असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून प्लॉट देण्यास नकार दिला व गणेश कोंढरे यांनी सुभाष सूर्यवंशी यांच्या नावे धनादेश दिला परंतु तो जमा झाला नाही.

तसेच सदर बिल्डर गणेश कोंढरे यांनी सुभाष सूर्यवंशी व इतर २२ गुंतवणूकदाराची एकूण २,७१,९८,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime News)

याबाबत बिल्डर गणेश कोंढरे याला दि. २५ रोजी न्यायालयात हजर केले असता
पोलिसांनी आरोपीची १० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.
परंतु बिल्डर गणेश कोंढरे यांचे वकिल ॲड. अभिजित सोलनकर
यांचा सर्व पुरावे हे कागदोपत्री उपलब्ध असल्याचा युक्तिवाद मा. न्यायाधीश एस.जी. बर्डे (Judge S.G. Barde)
यांनी मान्य करून त्यांना ३१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
याप्रकरणी ॲड. अभिजित सोलनकर (Adv. Abhijit Solankar) व ॲड. सागर शिंदे (Adv Sagar Shinde) यांनी काम पाहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…

Health News | दुचाकी चालवताना शेकडो तरुण-तरुणी, महिला वापरतात इयरफोन, वेळीच व्हा सावध व्हा! ‘हे’ 5 प्रकारचे गंभीर नुकसान टाळा