Health News | दुचाकी चालवताना शेकडो तरुण-तरुणी, महिला वापरतात इयरफोन, वेळीच व्हा सावध व्हा! ‘हे’ 5 प्रकारचे गंभीर नुकसान टाळा

नवी दिल्ली : Health News | सध्या तरूण मुले-मुली दिवसभर इअरफोन (Earphones) लावून असतात. गाणी, मीटींग, फोनवर सतत बोलणे यासाठी तासनतास इअरफोन लावलेला असतो. पुण्यासारख्या शहरात तर दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना बहुसंख्य तरुण-तरुणी, महिला इयरफोनचा वापर करून फोनवर बोलत असतात अथवा गाणी ऐकत असतात. पण याचे आरोग्यासाठी किती दुष्परिणाम आहेत हे अनेकांना माहित नसते. शिवाय वाहन चालवताना यामुळे अपघात होण्याची देखील भीती असते. याचे शरीरावर होणारे गंभीर परिणाम जाणून घेऊया…

इअरफोनच्या वापरामुळे होणारे नुकसान

मानसिक आरोग्य
इअरफोनचा आवाज सतत खुप जास्त ठेवल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. कान खराब होतात. ऐकण्याची क्षमताही कमी होते.

कानाला संसर्ग
जास्त वेळ हेडफोन घातल्याने रक्तप्रवाहात बदल होऊ शकतो, यामुळे कानाला इजा होते. कानाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. (Health News)

कान दुखणे, सूज येणे
हेडफोन्सचे पॅडिंग किंवा डिझाइन योग्य नसल्यास कानात दुखणे आणि सूज येऊ शकते.

ऐकण्याची क्षमता
जास्त आवाजामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. कानांच्या नसा कालांतराने खराब होतात.

डोकेदुखी
तासनतास इअरफोन वापरल्याने डोकेदुखीची समस्या होऊ शकते. अनेकांना ही समस्या होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)