Pune Crime News | सराईत वाहन चोराला बंडगार्डन पोलिसांकडून अटक, ऑटोरिक्षा, मोटारसायकल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर आणि परिसरात वाहनचोरी (Vehicle Theft) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 1 लाख 80 हजार रुपयांचे ऑटोरिक्षा, दुचाकी जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. छोटू शेख (वय 21 रा. शिवनेरी नगर, गल्ली नंबर 18, कोंढवा, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात (Pune Crime News) आलेल्या आरोपीचे नाव आहे.
बंडगार्डन पोलीस ठाणे (Bundgarden Police Station) हद्दीत शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने तपास पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार रफिक छोटू शेख याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या 2 ऑटो रिक्षा 1 दुचाकी असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपी रफिक छोटू शेख याने बंडगार्डन, कोंढवा (Kondhwa Police Station), निगडी पोलीस ठाण्यातील (Nigdi Police Station) गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime News)
ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे (ACP R.N. Raje), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील
(Senior Police Inspector Santosh Patil), पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते
(Inspector of Police (Crime) Ashwini Satpute) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे
(PSI Ravindra Gawde), पोलीस अंमलदार मोहन काळे, सुधीर घुटकुले, अमोल सरडे, शंकर संपते,
ज्ञाना बडे संजय वणवे, मनोज भोकरे, शिवाजी सरक यांचे पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | Bundagarden Police arrests inn vehicle thief, seizes autorickshaw, motorcycle
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update