Pune Crime News | पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात 12 ठिकाणी घरफोडी करणार्‍याला अटक, 5 लाखाचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात 10-12 ठिकाणी घरफोडी करणार्‍याला लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याच्याकडून लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दतील घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख 97 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime News)

 

राजकुमार ओंकारआप्पा आपचे Rajkumar Omkarappa Aapache (28, धंदा – मजुरी, मुळ रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव – Dharashiv) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या घरफोडीच्या (Gharfhodi) गुन्हयाच्या अनुशंगाने पोलिस उपनिरीक्षक गोरे (PSI Amit Gore) आणि इतर पोलिस अंमलदार आरोपींचा शोध घेत होते. पोलिस अंमलदार नितीन गायकवाड, पोलिस अंमलदार श्रीनाथ जाधव आणि पोलिस अंमलदार शैलेश कुदळे यांना गोपनिय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहिती मिळाली की घरफोडी करणारा हा कवडीपाट टोलनाका परिसरात असून त्याने हाफ भायाचा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातली आहे. पोलिसांनी प्राप्त माहितीची खातरजमा केली. (Pune Crime News)

 

वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचुन आरोपीला ताब्यात घेवुन लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात नेले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात 10-12 ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले. मात्र, सध्या तरी त्याच्याकडून लोणीकाळभोर पोलिस ठत्तण्याच्या हद्दीतील घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 97 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjankumar Sharma),
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एल. चव्हाण (Sr PI DL Chavan), पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे (PI Subhas Kale), पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलिस अंमलदार सातपुते (बक्कल नं. 3871), गायकवाड, सायकर, बोरावके, जाधव, नागलोत, शिरगीरे, कुदळे, वीर, सोनवणे, महिला पोलिस अंमलदार विश्रांती फणसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

 

 

Web Title : Pune Crime News | Burglars arrested at 12 places in Pune, Pimpri and district, 5 lakh cash seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा