Pune Warje Police News | शाळेतून न सांगता निघून गेलेला मुलगा वारजे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पित्याकडे सुपूर्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Warje Police News | शाळेत कोणाला काहीही न संगाता निघून गेलेल्या मुलाला सुखरुप त्याच्या वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले. वारजे पोलिसांनी (Pune Police) मुलाच्या वडिलांचा शोध घेऊन त्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले. हा मुलगा एका व्यक्तीला गणपती माथा येथील हॉटेल जवळ सापडला होता. त्यांनी वारजे पोलिसांकडे (Pune Warje Police News) मुलाला दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांचा शोध घेऊन त्याला वडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Sr PI Sunil Jaitapurkar) यांनी दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा हा गुलाबराव वांजळे पाटील शाळा न्यू अहिरे गाव (Gulabrao Wanjale Patil School New Ahire Village) गणपती माथा वारजे या शाळेतून कोणासही न सांगता निघून गेला होता. मुलगा पोपट हॉटेल गणपती माथा येथे तुषार मते यांना मिळून आला. त्यांनी मुलास वारजे पोलीस स्टेशन (Pune Warje Police News) येथे घेऊन आले.

 

पोलिसांनी गणपती माथा येथे मुलाच्या घराचा शोध घेण्यास सुरुवात केली.
त्यावेळी मुलगा दांगट वस्ती येथे राहत असल्याची माहिती समजली.
पोलिसांनी दांगट वस्ती येथे जाऊ मुलाच्या वडिलांचा शोध घेतला.
वारजे पोलिसांनी मुलाचे वडिल नरेश मानसिंग आऊजी यांच्या ताब्यात मुलाला सुखरुप स्वाधीन केले. यावेळी मुलाच्या वडिलांनी वारजे पोलिसांचे आभार मानले.

 

Web Title : Pune Warje Police News | The boy who left school without informing was handed over to his father due to police vigilance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून सराफी दुकान लुटण्याच्या तयारीतील तिघांना अटक, हत्यारे जप्त

NCP Chief Sharad Pawar | कुणी काय म्हटले हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष आहे…

PSI Bribe Demand Case | गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी पीएसआयने मागितली 15 हजाराची लाच,
अ‍ॅन्टी करप्शनकडून कारवाई

Deepak Mankar | साहेबांबद्दल कायमच आदर ! जनतेसाठी आहोरात्र कष्ट घेणारे अजित पवार लोकनेते आहेत,
शरद पवार यांनी त्यांना आशिर्वाद देउन पाठीशी राहावे – दीपक मानकर

Maharashtra Political Crisis | शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता भाजपमध्ये होणार मोठा भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर?