Nitin Gadkari On Maharashtra Politics | ‘…मात्र मंत्रिमंडळाची क्षमता वाढवता येत नाही’, नितीन गडकरींचे वर्तमान राजकीय परिस्थितीवर भाष्य

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari On Maharashtra Politics |  सभागृहाची क्षमता खूप आहे किती ही लोकं आले तरी बसू शकतात. मात्र मंत्रिमंडळाची क्षमता (Capacity Cabinet) अशी वाढवता येत नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर लगावला आहे. राजकारणातील असमाधानी लोकांबद्दल बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari On Maharashtra Politics) म्हणाले, आपला देश आणि समाज अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे असे सूचक विधान त्यांनी केले. विद्यापीठ शिक्षण मंचाच्या गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, समाधान हे मानण्यावर असते. आपल्याला आपली क्षमता आणि पात्रतेपेक्षा जास्त मिळाले आहे असे आपण मान्य केले तर समाधान मिळते. नाहीतर आज सर्वच दुःखी आहेत. नगरसेवक दु:खी आहे कारण ते आमदार (MLA) झाले नाहीत. आमदार दु:खी आहेत कारण त्यांना मंत्री (Minister) होता आलं नाही. मंत्री दु:खी आहेत कारण त्यांना चांगलं खातं मिळालं नाही आणि आता जे मंत्री होणार होते ते यामुळे दु:खी आहे की आता त्यांना संधी मिळते की नाही अशी शंका आहे, कारण आता गर्दी झाली आहे. (Nitin Gadkari On Maharashtra Politics)

नितीन गडकरी यांनी गेल्या काही दिवसांपासून मंत्री होऊच अशा आविर्भावात फिरणाऱ्या नेत्यांवरही भाष्य केले. मागील काही दिवस सर्व तयारच होते. सूट शिवून, घालतो आणि जातो असा त्यांचा तोरा होता. परंतु, आता त्या सुटाचा काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. कारण गर्दीच एवढी झाली आहे. या हॉलची क्षमता जास्त आहे, त्यामुळे किती लोकं आले, तरी ते बसू शकतात. परंतु मंत्रिमंडळाची क्षमता वाढवता येत नाही. त्यामुळे आपला देश आणि समाज दुखी आत्म्यांचा महासागर आहे, असे गडकरींनी मिश्किलपणे म्हटले.

Web Title : Nitin Gadkari On Maharashtra Politics union minister nitin gadkari comment on current maharashtra political situation at nagpur

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून सराफी दुकान लुटण्याच्या तयारीतील तिघांना अटक, हत्यारे जप्त

NCP Chief Sharad Pawar | पक्ष फोडणाऱ्यांना किंमत मोजावी लागणार ! खा. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे निलंबित करत शरद पवारांचा इशारा

Bank fraud case: CBI registers FIR against Pune-based builder