Pune Crime News | पुण्यातील खडकी, लोणीकंद, चतु:श्रृंगी, कोंढवा परिसरात घरफोडी, सोने चांदीच्या दागिन्यांसह 12 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी घरफोडी (Burglary) करुन चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यासह 12 लाख 14 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. घरफोडीच्या घटना खडकी (Khadki Police Station), लोणीकंद (Lonikand Police Station), चतु:श्रृंगी (Chaturshringi Police Station), कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत घडल्या असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

बोपोडी येथील बंद फ्लॅटचा दरवाजा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरुमधील कपाटात ठेवलेले 6 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 24 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत राजीव अनिलचंद्र घोष (वय-54 रा. आयोध्या नगरी, शिंदे गार्डन सोसायटी, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 4 ऑक्टोबर सकाळी 6.30 दरम्यान घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ (PSI Gunjal) करीत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ही घटना 14 सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत सत्यप्रकाश अचितानंद यादव (वय-38 रा. गोकुळ पार्क, फेज-1, जानकी निवास, बकोरी रोड, लोणीकंद) यांनी फिर्य़ाद दिली आहे. लोणीकंद पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी 457, 454, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील दीड लाख रुपये किमतीचे 5 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार सकाटे करीत आहेत. (Pune Crime News)

चोरीची तिसरी घटना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरातील 62 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत आशतोष अरविंद बवनडीकर (वय-51 रा. विद्याश्री बंगला, हनुमान नगर, सेनापती बापट रोड,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे (PSI Sonwane) करीत आहेत.

कोंढवा परिसरातील एन.आय.बी.एम रोडवरील कुमार पाम स्प्रिंग सोसायटीतील बंगल्यातून
चोरट्यांनी 20 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 7 लाख 16 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबत सुनिल जियालाल जारु (वय-62 रा. कोंढवा खु.) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्य़ादी हे जोगेश वाली (वय-70) यांच्या बंगल्याचे केअर टेकर म्हणून काम करतात.
5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बंगल्याला कुलूप लावून ते गेले होते.
शनिवारी (दि.7) सकाळी पावणे अकराच्या सुमारास ते बंगल्यात आले असता दरवाजाचे कडी कोयंडे तोडल्याचे दिसले.
त्यांनी बंगल्यात जाऊन पाहिले असता चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचे दिसून आले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे (API Shinde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोकसेवक असल्याचे भासवून पुणे रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे दाखवले आमिष, फसवणूक करणाऱ्या 5 जणांवर FIR