
Pune Crime News | लोकांच्या नावावर कर्ज काढून अनेकांची फसवणूक ! फसवणूक झालेल्या व्यवासायिकाची आत्महत्या; खराडीमधील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोकांच्या नावावर कर्ज काढून कोटीचा गंडा घातल्याप्रकरणी फसवणूक (Fraud) झालेल्या एका व्यावसायिकाने (Businessman) आत्महत्या केल्याचा (Committed Suicide) प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 13 जुलै रोजी पहाटे पावणेचार वाजता घडला.
प्रभात शंभुप्रसाद रंजन Prabhat Shambhuprasad Ranjan (वय-46 रा. विठ्ठलनगर, खराडी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत राजीव शंभुप्रसाद रंजन Rajiv Shambhu Prasad Ranjan (वय-48 रा. झारखंड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अष्टविनायक फर्मचे मालक (Ashtavinayak Firm) सेल्वा नाडर (Selva Nader), प्रसाद शिंदे (Prasad Shinde), सचिनकुमार Sachin Kumar (रा. जनदेव पथ, पाटणा), अजिंक्य लोखंडे Ajinkya Lokhande (रा. रेव्हेरिया सोसायटी, वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रंजन हे खराडी येथे पत्नी व दोन मुलीसंह राहत होते. प्रभात यांनी आत्महत्या केल्याचे समजल्यावर फिर्यादी हे भावाच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना ड्रॉव्हर मध्ये एक चिठ्ठी सापडली. अष्टविनायक फर्मचे मालक सेल्वा नाडर व प्रसाद शिंदे यांनी फर्ममध्ये पैसे गुंतवण्यास सांगून जुलै 2021 मध्ये 90 लाख रुपये कर्ज (Loan) काढण्यास सांगितले. हे पैसे त्यांनी फर्ममध्ये गुंतवले. फेब्रुवारी 2023 मध्ये नाडर हा कार्यालय बंद करुन पळून गेला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing (EOW) बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
सचिनकुमार याने एस एस एंटरप्राईजेस (SS Enterprises) कंपनीत पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून 15 लाख रुपये घेतले. तसेच खोटी कागदपत्र तयार करुन फसवणूक केली. तर रंजन यांची मर्सिडीज कार (Mercedes Car) अजिंक्य लोखंडे याने 7 लाख 50 हजार रुपयांना खरेदी केली. या व्यवहारात तीन लाख रुपये देऊन उर्वरित साडेचार लाख रुपये दिले नाहीत.
सर्व आरोपींनी मिळून रंजन यांची 1 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.
त्यामुळे होणाऱ्या त्रासाने रंजन यांनी त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
सेल्वा नाडर व इतरांनी अनेक लोकांची फसवणूक केली आहे.
त्यामध्ये फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | businessmans ended life case has been registered against four people
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Aditya Roy Kapoor And Ananya Pandey | आदित्य रॉय कपूरने रोमॅंटिक रिलेशनबाबत मांडले मत
- Maharashtra Political News | ‘स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात…’, फोटो ट्विट करत रोहित पवारांचे भाजपवर टीकास्त्र
- Vicky Kaushal And Katrina Kaif | लवली कपल कतरिना व विकी हातात हात घालून एअरपोर्टवर स्पॉट
- Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचं ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’, 1800 हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती