Pune Crime News | सांभाळ करणार्‍या मुलीच्या नावावर हिस्स्याचे बक्षीसपत्र केल्याने मुलाने केले बनावट हक्क सोडपत्र; आईने आपल्याच मुलावर केला गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | आईला घराबाहेर काढल्यानंतर मुलीने तिचा सांभाळ केला. गंभीर आजारात सर्व औषधोपचार केले. त्यामुळे एका ज्येष्ठ नागरिक महिलेने मालमत्तेतील आपल्या हिस्शाचा वाटा मुलीच्या नावाने बक्षीसपत्र करुन दिले. हे समजल्यावर मुलाने आईची बनावट सही करुन बनावट नोटराईज हक्क सोडपत्र तयार करुन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत जयश्री पृथ्वीराज चव्हाण (वय ६८, रा. मोहम्मदवाडी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत पृथ्वीराज चव्हाण Prashant Prithviraj Chavan (रा. सोमवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील नोटरी रजिस्टार भारत गोगावले (Notary Registrar Bharat Gogawle) यांच्या कार्यालयात २९ जुलै २०२१ मध्ये घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे पती देहुरोड येथील अ‍ॅम्युनेशन डेपोमध्ये नोकरीला होते. कामावर असताना १९ मे २००६ रोजी त्यांचा मृत्यु झाला. त्यांना प्रशांत, विनोद चव्हाण ही दोन मुले व मुलगी नम्रता मोरे असे तीन मुले आहेत. पती निधनानंतर त्यांनी मुलगा प्रशांतबरोबर आंबेगाव पठार येथील गणेश कॉम्प्लेक्स मध्ये अर्धा अर्धा हिस्सा असलेला सामाईक फ्लॅट खरेदी केला होता. त्यांना मिळणार्‍या पेन्शन रक्कमचे व्यवहार मोठा मुलगा प्रशांत व सून निता चव्हाण पहात होते. भाडेही त्यांच्या वैयक्तिक उपयोगासाठी वापरत होते. तरीही त्यांचा शारीरीक व मानसिक छळ करुन मार्च २०१६ मध्ये त्यांनी फिर्यादी यांना घराबाहेर काढले.

त्यानंतर त्या मुलगी नम्रता मोरे हिने त्यांचा सांभाळ केला. लहान मुलगा विनोद चव्हाण हा त्यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यानंतर त्यांना जुलै २०१६ मध्ये कॅन्सरचे निदान झाले. त्यासाठी लागणार्‍या औषधोपचाराचा खर्च त्यांची मुलगी करत होती. फ्लटच्या भाड्यातील हिस्याबाबत त्यांनी मोठ्या मुलाकडे पैसे मागितल्यावर तो रागावून त्यांना शिवीगाळ करु लागला. तेव्हा त्यांनी फ्लॅटचा हिस्याचा मोबादला मागितला. तेव्हा त्याने नकार दिला. त्यानंतर आपला सांभाळ करणारी व औषधोपचारावर खर्च करणार्‍या मुलीच्या नावाने फिर्यादी यांनी त्यांच्या फ्लॅटच्या हिस्याचे बक्षीसपत्र २०१८ मध्ये रितसर करुन दिले होते. (Pune Crime News)

मुलाने फ्लॅटची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station)
तक्रार अर्ज दिला होता. त्याच्या अर्जाच्या चौकशीकामी पोलिसांनी प्रशांत याला बोलावले होते.
तेव्हा प्रशांत याने पोलिसांना सादर केलेल्या कागदपत्रामध्ये नोटरी रजिस्टर केलेले एक हक्कसोड होते.
५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर त्यांची बनावट सही केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
नोटरी रजिस्टार भारत गोगावले यांच्या कार्यालयामध्ये ते नोटरी केल्याचे दिसून आले.
आपल्या मालमत्तेतील आपल्या हिस्यातील आर्थिक लाभ मिळू नये, या उद्देशाने बनावट नोटराईज
हक्कसोडपत्र बनवून मुलाने आला. विश्वासघात करुन फसवणूक (Fraud) केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस उपनिरीक्षक माने (PSI Mane) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | स्टेज कोसळून चार महिला जखमी प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल; गणेश पेठेतील पांगुळ आळीतील घटना (Video)