Pune Crime News | इंदापूरमध्ये ट्रक पेटवल्याप्रकरणी 14 जणांवर FIR, घटनेत पोलीस कर्मचारी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Solapur Highway Accident) इंदापूर शहराच्या बाह्यवळणावर मंगळवारी (दि.24) भीषण अपघात झाला होता. एका भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वारास चिरडले होते. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला होती. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) संबंधित 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. (Pune Crime News)

याबाबत पोलीस कॉनस्टेबल अर्जुन पांडुरंग नरळे यांनी इंदापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गलांडवाडी नंबर 1 गावच्या हद्दीतील सोलापूर-पुणे हायवे रोडच्या कडेला असलेल्या मातोश्री हॉटेलच्यासमोर हा अपघात झाला होता. त्यानंतर संतप्त जमानावे ट्रक पेटवून दिला. यामुळे 18 ते 20 लाख रुपयांचे नुकसान केले. आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या वाहनाला साधारण एक तास आडवून आग विझवून दिली नाही. (Pune Crime News)

त्यावेळी संतप्त जमावाला समजावून सांगण्यात आले मात्र लोक ऐकत नसल्याने पोलिसांना जमाव पांगवण्याचे आदेश दिले. तरीही संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवून पोलिसांच्या आदेशाची अवज्ञा केली व पोलिसांशी धक्काबुक्की करुन अरेरावीची भाषा करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून त्यांच्या विरोधात सरकारतर्फे कायदेशीर फिर्य़ाद दिली आहे.

हा ट्रक (एमएच 31 ए.जे. 9273) सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघाला होता. या अपघातात दशरथ मारुची
चोरमले (वय-55 रा. काळखेवस्ती, गलांडवाडी नं.1 ता. इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर आरोपी ट्रक चालक ट्रक तेथेच सोडून पळून गेला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : केबल टाकण्याचे काम करणाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

Jalgaon Suicide News | दसऱ्याच्या दिवशी आई-वडीलांवर मोठा आघात, पोलिसाच्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या