Pune Crime News | माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलावर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | वानवडी येथील जमिनीचे सरंक्षण करण्यासाठी त्यावर कंपाऊंड घालण्याचे काम करीत असताना जमीन मालक महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन साडीचा पदर ओढून विनयभंग (Molestation Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

अभिजित चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब शिवरकर (Abhijit Chandrakant alias Balasaheb Shivarkar), भास्कार रत्नाकर गायकवाड (Bhaskar Ratnakar Gaikwad) व त्यांच्या पत्नी आणि मुलगा, राजेश खैरालिया (रा. वानवडीगाव), किरण छेत्री व इतर १० जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ४० वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४३/२३) दिली आहे. हा प्रकार वानवडी येथील महात्म फुले सांस्कृतिक भवनामागील सिटी सर्व्हे नं. ७९०/५३ मध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची व त्यांच्या भावकीची वडिलोपार्जित मिळकत आहे.
फिर्यादी या जागेच्या वारस आहे. त्यांनी जागेची भुमापन अधिकारी यांच्याकडून सरकारी मोजणी केली आहे.
त्या ठिकाणी काही महिला व पुरुष कामगार यांच्याकडून कपांऊड लावण्याचे काम चालू होते.
आरोपी यांनी कामगारांना काम करण्यापासून रोखून लोखंडी पिलर काढून टाकले तसेच अभिजित शिवरकर व भास्कर गायकवाड यांनी फिर्यादी यांना आम्ही मालक आहोत, असे म्हणून त्यांना अश्लिल शिवीगाळ करुन त्यांच्या साडीचा पदर ओढून हाताने पकडून फरफटत ओढून जागेच्या बाहेर काढून काढले. पुन्हा या जागेतमध्ये दिसाल तर तुमच्या सहीत तुमच्या भावकीचे येथेच मुडदे पाडु अशी धमकी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCOS Awareness Month | महिलांनो, ही 10 लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष, असू शकतो पीसीओएस, कारण, रिस्क फॅक्टर्स जाणून घ्या

Kodo Millet Benefits | आकाराने छोटे, पण पोषक तत्वाचे पॉवरहाऊस, कोलेस्ट्रॉलपासून शुगरपर्यत 5 मोठ्या आजारात अमृत समान