Kodo Millet Benefits | आकाराने छोटे, पण पोषक तत्वाचे पॉवरहाऊस, कोलेस्ट्रॉलपासून शुगरपर्यत 5 मोठ्या आजारात अमृत समान

नवी दिल्ली : Kodo Millet Benefits | संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ वर्ष इंटरनॅशनल ईयर ऑफ मिलेट घोषित केले आहे. भरड धान्यांमध्ये यूएनने प्रामुख्याने ५ धान्यांचा समावेश केला आहे. यापैकी कोडो मिलेट देखील प्रमुख आहे. कोडो मिलेट आकाराने लहान आणि गोल असते. परंतु ते पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. कोलेस्ट्रॉल ते ब्लड शुगर कमी करण्यात हे अमृत समान आहे. कोडो मिलेटचे फायदे जाणून घेऊया. (Kodo Millet Benefits)

१. इन्सुलिन वाढवते –

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले की कोडो हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. यामध्ये अनेक प्रकारची व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायटोकेमिकल्स असतात. यामध्ये ८.३ टक्के प्रोटीन आणि ९ टक्के फायबर असते. (Kodo Millet Benefits)

यातील फिनोलिक अ‍ॅसिड स्वादुपिंडात अमायलेज वाढवते जे इंसुलिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते. यामुळे ब्लड शुगर वाढत नाही.

२. कॅन्सरचा धोका करते कमी –

कोडोमध्ये फिनोलिक अ‍ॅसिड तसेच टॅनिन आणि फायटेट्स असतात जे पोषक घटक म्हणून काम करतात. यामुळे कोलन आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.

३. हार्ट अटॅकचा धोका कमी –

लठ्ठपणा, स्मोकिंग, चुकीचा आहार आणि संथ हालचाली यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. या वाईट सवयींमुळे हृदयाच्या स्नायूंमध्ये स्ट्रेन निर्माण होतो आणि फ्री रॅडिकल्स तयार होतात. कोडोचे सेवन या गोष्टी साफ करते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

४. मूड करते बूस्ट –

कोडो मिलेटमध्ये लेसिथिन नावाचे कंपाउंड आढळते जे मज्जासंस्थेला चालना देते. यामुळे मूड चांगला राहतो. मनावर ताण राहत नाही.

५. स्किनसाठी फायदे –

कोडो मिलेटमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि फेनोलिक अ‍ॅसिड असते. तसेच फ्लेव्होनॉइड असतात. हे सर्व मिळून शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकतात. फ्री रॅडिकल्स कमी झाल्यामुळे त्वचेवरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. यामुळे त्वचेमध्ये होणारे पेशींचे नुकसान त्वरित भरून काढले जाते. यामुळे त्वचेला ग्लो येतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर