Pune Crime News | चंदननगर: कौटुंबिक वादातून विवाहितेचा खून; पती पोलीस ठाण्यात हजर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकुने वार केल्याची घटना खराडी भागात घडली. महिलेचा खून (Murder in Pune) करुन पती स्वत:च चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) हजर झाला. (Pune Crime News)

लक्ष्मी केशव सीताफळे (वय ४०, रा. लेबर कॅम्प, पाटीलबुवानगर, खराडी) असे खून (Pune Murder News) झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीचा पती केशव भीमराव सीताफळे (वय ४५) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. केशवने पत्नीला शिवीगाळ करुन तिचा गळा चाकुने चिरला. पत्नीचा खून करुन तो पोलीस ठाण्यात हजर झाला. खूनामागचे निश्चित कारण समजले नसून, प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून पतीने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mental health | Perfect बनण्याच्या अट्टाहासात लोक होत आहेत मानसिक आजारी, जाणून घ्या ब्रेन कसा ठेवावा हेल्दी!

Ear Infection Increases During Monsoon: Here’s How You Can Deal With It Naturally

24 August Rashifal : कर्क आणि कुंभ राशीवाल्यांना मिळू शकते मोठी डील फायनल करण्याची संधी, वाचा १२ राशींचे दैनिक भविष्य

How To Reduces Belly Fat | उपवास केल्याने पोटाची चरबी जलद वितळते का? वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किती योग्य, जाणून घ्या एक्सपर्टचे मत