Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – मित्र-मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी घातली पोलिसांची वर्दी; अन् अडकला जाळयात

पुणे : Pune Crime News | मित्र मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने आपण पोलीस असल्याचे सांगत पोलिसांचा गणवेश घातला. पण, पेट्रोलिंग करणार्‍या चतु:श्रृंगी पोलिसांनाच (Chaturshringi Police Station) त्याने औंध चौकीत (Aundh Police Chowki) नेमणूकीला असल्याचे सांगितल्याने त्याचे बिंग फुटले. पुणे पोलिसांनी (Pune Police) त्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

यशवंत रमेश धुरी Yashwant Ramesh Dhuri (वय ३०, रा. तापकीरनगर, नडे कॉलनी, काळेवाडी – Kalewadi) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले (Police Shreekant Waghwale) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९८/२३) दिली आहे. हा प्रकार औंधमधील नागरस रोडवरील (Nagras Road Aundh) राम नदीच्या पुलावर रविवारी दुपारी दीड वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक
(PSI Nileshkumar Mahadik) व त्यांचे सहकारी हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी राम नदीच्या (Ram Nadi Pune) पुलावर एक पोलीस उभा असल्याचे त्यांना दिसले.
तो अनोळखी वाटल्याने पोलिसांनी त्याला नेमणुकीस कोठे आहे, असे विचारले असता त्याने औंध चौकीला
पोलीस असल्याचे सांगितले. त्याचा गणवेश जरी पोलिसांचा असला तरी पायात चप्पल होती.
खाकी ड्रेसच्या खांद्यावर म. पो. कॅपवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले होते.
त्यामुळे तो खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणले.

अधिक चौकशी केली असता तो डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) म्हणून काम करीत असून मित्र मैत्रिणीवर
इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने हा गणवेश घातला असल्याचे सांगितले.
पोलीस हवालदार कापरे (Police Havaldar Kapre) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Chathushringi Police Station – Police uniform worn to impress friends; And caught in the net

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दुर्देवी : शेततळयात बुडून बापलेकाचा मृत्यु, मदत मिळाल्याने आई वाचली

Deepak Kesarkar | विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर