Pune Crime News | एक कोटीची फसवणूक झाल्याने संगणक अभियंत्याची आत्महत्या, पुण्यातील घटना

अष्टविनायक फर्मचे संचालक सेल्वा नाडर, प्रसाद शिंदे, सचिनकुमार, अजिंक्य लोखंडे यांच्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गुंतवणुकीत फसवणूक (Fraud Case) झाल्याने एका संगणक अभियंत्याने (Computer Engineer) इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची (Suicide In Kharadi Pune) घटना पुण्यातील खराडी भागात घडली आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अष्टविनायक फर्मच्या संचालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना (Pune Crime News) 13 जुलै रोजी पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली होती.

प्रभात शंभुप्रसाद रंजन Prabhat Shambhuprasad Ranjan (वय-46 रा. विठ्ठलनगर, खराडी) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याबाबत राजीव शंभुप्रसाद रंजन Rajiv Shambhu Prasad Ranjan (वय-48 रा. झारखंड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अष्टविनायक फर्मचे संचालक (Ashtavinayak Firm) सेल्वा नाडर (Selva Nader), प्रसाद शिंदे (Prasad Shinde), सचिनकुमार Sachin Kumar (रा. जनदेव पथ, पाटणा), अजिंक्य लोखंडे Ajinkya Lokhande (रा. रेव्हेरिया सोसायटी, वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

प्रभात रंजन एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत (IT Company) कामाला आहेत. गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झाल्याने त्यांनी 13 जुलै रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली. प्रभात रंजन यांनी आत्महत्या करणयापूर्वी लिहिलेली सुसाइड नोट (Suicide Note) पोलिसांनी जप्त केली. फसवणूक झाल्याने आत्महत्या केल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रंजन हे खराडी येथे पत्नी व दोन मुलीसंह राहत होते. प्रभात यांनी आत्महत्या केल्याचे समजल्यावर फिर्यादी हे भावाच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना ड्रॉव्हर मध्ये एक चिठ्ठी सापडली. अष्टविनायक फर्मचे संचालक सेल्वा नाडर व प्रसाद शिंदे यांनी फर्ममध्ये पैसे गुंतवण्यास सांगून जुलै 2021 मध्ये 90 लाख रुपये कर्ज (Loan) काढण्यास सांगितले. हे पैसे त्यांनी फर्ममध्ये गुंतवले. फेब्रुवारी 2023 मध्ये नाडर हा कार्यालय बंद करुन पळून गेला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing (EOW) बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

सचिनकुमार याने एस एस एंटरप्राईजेस (SS Enterprises) कंपनीत पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळवून देतो,
असे सांगून 15 लाख रुपये घेतले. तसेच खोटी कागदपत्र तयार करुन फसवणूक केली.
तर रंजन यांची मर्सिडीज कार (Mercedes Car) अजिंक्य लोखंडे याने 7 लाख 50 हजार रुपयांना खरेदी केली.
या व्यवहारात तीन लाख रुपये देऊन उर्वरित साडेचार लाख रुपये दिले नाहीत.

सर्व आरोपींनी मिळून रंजन यांची 1 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.
फसवणुक झाल्याने प्रभात रंजन यांनी नैराश्यातून आत्महत्या केली.
त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर (API Khandekar) तपास करत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Computer engineer commits suicide due to fraud of 1 crore, incident in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bachchu Kadu | ‘अजित पवारांच्या सोयीनुसार खातेवाटप’, खातेवाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Pune Cyber Crime News | पुण्याच्या येरवड्यातील इझी पे प्रा.लि. कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक करणार्‍या नोंदणीकृत एजंटास सायबर पोलिसांकडून अटक

ACB Trap News | वृद्ध शेतकऱ्याकडून 2 लाखाची लाच घेताना दैनिकाच्या संपादकासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून मुंढव्यातील ICICI बँकेचे एटीएम फोडुन चोरी करणार्‍यांना 24 तासात अटक