Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी देऊन कोयत्याने वार, मुंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन एकाला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन कोयत्याने वार केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका तरुणावर मुंढवा पोलिसांत (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुंढवा येथील जनसेवा बँकेच्या समोर 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते आठच्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत कुणाल संजय साळुंके (रा. जनसेवा बँकेच्या शेजारी, मयुरेश्वर कॉलनी, केशवनगर, मुंढवा) याने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यावरुन अनुप ढगे (वय-23 रा. झेड कॉर्नर जवळ, केशवनगर मुंढवा) याच्यावर आयपीसी 307, 504, 506 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. फिर्यादी कुणाल सोमवारी (दि.13) केशवनगर भागात दाबेली खाण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी अनुप ढगे त्याठिकाणी आला. त्याने भांडणाचा राग मनात धरून कुणाल याला शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन लाकडी दांडक्याने व लोखंडी कोयत्याने कुणालच्या हातावर व डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले.

त्यानंतर हवेत कोयता फिरवून परिसरात दहशत माजवून निघून गेला.
घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडे (PSI Gade) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | कोंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 56 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे शहरात सोनसाखळी चोर सक्रीय, भाऊबीजेला दोन महिलांचे दागिने हिसकावले

खडकीत कोयता गँगचा राडा, जुन्या भांडणातून दोन तरुणांवर कोयत्याने वार

बनावट कागदपत्रे तयार करुन संपत्तीवर कब्जा, पुण्यातील बांधकाम व्यावसायिकासह दोघांवर FIR

पुणे : अल्पवयीन मुलीसोबत लग्न… पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल