Pune Crime News | पुण्यात मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेकडून अटक, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मेफेड्रोन (Mephedrone (MD) या अमली पदार्थाची विक्री करताना एका तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ने Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 7 लाख 27 हजार रुपये किंमतीचे मेफेड्रोन जप्त केले आहे. ही कारवाई (Pune Crime News) शुक्रवारी (दि.11) केली.

दिनेश मनोहर काळे Dinesh Manohar Kale (वय 24 रा. जाधव वस्ती, मुक्काम पोस्ट जवखेड, जि. अहमदनगर सध्या रा. पार्किंग क्रमांक दोन, संगमवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे पोलीस अंमलदार हे पोलीस आयुक्तांच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन जगदाळे (Nitin Jagdale) व योगेश मांढरे (Yogesh Mandhare) यांना बातमी मिळाली की, एक तरुण बिबवेवाडी कडे जाणाऱ्या सर्विस रोडवर सॅमसंग दुकानासमोरील सार्वजनिक रोडवर मेफेड्रोन (एम.डी.) हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा कारवाई करुन त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 7 लाख 27 हजार रुपयांचा 36 ग्रॅम 350 मिलीग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन त्याच्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे (PI Sunil Thopte), पोलीस उपनिरीक्षक एस.डी. नरके (PSI S.D. Narake) पोलीस अमलदार नितीन जगदाळे, योगेश मांढरे चेतन गायकवाड, महेश साळुंखे, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संदीप जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात साजरा करा, पुणे पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन