Pune Crime News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोबाईल जबरदस्तीने चोरून नेणार्‍यांना अटक, 8 गुन्हे उघडकीस

गुन्हे शाखा युनिट-1 कडून 14 मोबाईल व वाहन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) युनिट-1 च्या पथकाने मोबाईल जबरदस्तीने (Mobile Thief) चोरून नेणार्‍या तिघांना अटक केले असून त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे (Pune Robbery). पोलिसांनी आरोपींकडून 14 मोबाईल आणि गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण 1 लाख 91 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime News)

 

धनराज शिवाजी काळुंके Dhanraj Shivaji Kalunke (21, रा. वाडेश्वर नगर, बॉलिवुड थिएटर जवळ, वडगांव शेरी – Vadgaon Sheri), विरेंद्रकुमार जगदीशप्रसाद प्रजापती Virendra Kumar Jagdishprasad Prajapati (25, रा. ताडीवाला रोड, मेरू हॉटेल, पुणे) आणि किशोर सुरेश कोल्हे Kishore Suresh Kolhe (30, रा. गवळी गल्ली, सारथी शाळेशेजारी, साईनाथनगर, वडगांव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पालखी सोहळयाच्या पार्श्वभुमीवर गुन्हे शाखेतील युनिट-1 चे अधिकारी व पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील (Criminals On Pune Police Record) गुन्हेगारांबद्दल माहिती घेतले होते. त्यावेळी पोलिस अंमलदार अनिकेत बाबर (Police Aniket Babar) यांना काहीजण हत्ती गणपती (Hatti Ganpati Pune) मंदिराच्या समोरील बाळामध्ये सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) मोटारसायवरून येणार असून ते मोबाईलची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr PI Shabbir Sayyad) यांना कळविले. त्यावेळी त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Pune Crime News)

प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 मोबाईल आणि दुचाकी असा एकुण 1 लाख 91 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपींकडून विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये (Vishrambaug Police Station) दाखल असलेले 2, समर्थ पोलिस स्टेशनमधील (Samarth Police Station) 3, फरासखाना पोलिस स्टेशन (Faraskhana Police Station), दत्तवाडी पोलिस स्टेशन (Dattawadi Police Station) आणि बंडगार्डन पोलिस स्टेशनमधील (Bundgarden Police Station) प्रत्येकी एक असे एकुण 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपी धनराज शिवाजी काळुंके हा पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द वाहन चोरीचे (Vehicle Theft) 6 गुन्हे दाखल आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद,
सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर (API Ashish Kavthekar),
पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलिस उपनिरीक्षक रमेश तापकीर (PSI Ramesh Tapkir),
पोलिस उपनिरीक्षक अजय जाधव (PSI Ajay Jadhav), पोलिस अंमलदार अनिकेत बाबर,
राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, आय्याज दड्डीकर, अभिनव लडकत, इमरान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई,
आण्णा माने, तुषार माळवदकर आणि महेश बामगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :  Pune Crime News | Crime Branch of Pune Police arrested those who forcibly stole mobile phones, 8 crimes were revealed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा