Hardeep Singh Puri | सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

नवी दिल्ली : Hardeep Singh Puri | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) सातत्याने वाढ होत असून, पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपये आणि डिझेल 90 रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात आहे. मात्र आता लवकरच त्याचे दर खाली येण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री (Petroleum Minister) हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिले आहे.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Narket) कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) स्थिर राहिल्यास तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतात, असे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. त्याचबरोबर तेल कंपन्यांची कामगिरी कशी असते, यावरही ते अवलंबून असेल. या कंपन्यांनी पुढील तिमाहीत चांगली कामगिरी केल्यास ते किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याबाबत कोणतीही घोषणा करू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
पुढे काय होते आणि काय करता येईल हे पहावे लागेल, असे ते म्हणाले. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बाजारावर अवलंबून असतात, परंतु मोदी सरकारने (Modi Government) एप्रिल 2022 पासून त्यांच्या किमती वाढू दिलेल्या नाहीत.
सर्वसामान्यांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे हरदीप सिंग पुरी म्हणाले.

 

Web Title :  Hardeep Singh Puri | petrol diesel likely to become cheaper the
petroleum minister Hardeep Singh Puri gave the indication

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा