Pune Police News | एव्हरेस्टवीर पोलिस स्वप्निल गरड यांच्या पार्थिवावर मुंढव्यातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलिस (Pune Police News) दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत (EoW Pune) कार्यरत असलेले पोलिस अंमलदार स्वप्नील गरड (Swapnil Garad) यांच्या पार्थिवावर आज (रविवार) सकाळी मुंढवा (Mundhwa) येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. यावेळी पुणे पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. आकाशाला भेदून टाकणारा जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर स्वप्नील गरड यांचं निधन झालं होतं. त्यांचं पार्थिव आज पुण्यात आणण्यात आल्यानंतर अत्यंसंस्कार करण्यात आले. (Pune Police News)

 

 

मुंढव्यातील स्मशानभूमीत मोठी गर्दी झाली होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वप्नील गरड यांना मानवंदना देत श्रध्दांजली वाहिली. (Pune Police News)

 

 

 

माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर स्वप्नील गरड यांचे ब्रेन डेड (Brain Dead) झाले होते. त्यांच्यावर काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये ((Kathmandu Hospital) उपचार सुरू होते. अति दक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं समजल्यानंतर पुणे पोलिसांची एक टीम काठमांडूला रवाना देखील झाली होती. त्यांची पकृती खालावत गेली आणि अखेर त्यांचं दि. 7 जून 2023 रोजी निधन झालं.

स्वप्नील गरड यांचं पार्थिव आज पुण्यातील मुंढवा येथे आणण्यात आलं होतं. गरड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गरड यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्र परिवारासह पोलिसांवर शोककळा पसरली आहे.

 

Web Title :  Pune Police News | Everest Police officer Swapnil Gard cremated with state honors at the cemetery in Mundhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा