Pune Crime News | गुन्हे शाखेने दोन परदेशी नागरिकांकडून एमडी, एमडीएमए अंमली पदार्थ जप्त, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची (Narcotics) तस्करी केली जात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Squad) एकच्या पथकाने दोन परदेशी नागरिकांना अटक करुन त्यांच्याकडून एमडी (MD), एमडीएमए पिल्स (MDMA Pills), कॅथा ईडुलस खत (Catha Edulus Fertilizer) हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 11 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी नायझेरियन (Nigerian) नागरिकासह एका महिलेला अटक केली आहे. (Pune Crime News)

फिलीप विलीयम इडिली Philip William Idylley (वय-49 सध्या रा. कोठारी फॅशन मागे, उरुळी देवाची, हडपसर, पुणे मुळ रा. गाव बिनी, लागोस स्ट्रीट, नायजेरीया) याच्यासह त्याच्या परदेशी मैत्रिणीला अटक केली आहे. आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच (Loni Kalbhor Police Station) एनडीपीएस अॅक्ट कलम 8(क), 21(ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर (Police Officer Pravin Uttekar) यांनी फिर्याद दिली आहे.

पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच परदेशी नागरिकांकडून होणारी अंमली पदार्थाची तस्करीचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर व पांडुरंग पवार यांना माहिती मिळाली की, अंमली पदार्थ रेकॉर्डवरील परदेशी आरोपी फिलीप इडिली हा त्याच्या परदेशी मैत्रिणीसह वेगवेगळ्या अंमली पदार्थाची उरुळी देवाची परिसरात विक्री करत आहेत. (Pune Crime News)

पोलिसांच्या पथकाने उरुळी देवाची येथील आर्चिवर इंटरनॅशनल स्कुल (Archiver International School) जवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकून आरोपी फिलीप इडिली आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता 5 लाख 16 हजार रुपये किमतीचे 25 ग्रॅम 8 मिलीग्रॅम कोकेन, 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम 5 मिलीग्रॅम एमडीएमए च्या 12 पिल्स, 1 लाख दोन हजार रुपये किमतीचे 1 किलो 275 ग्रॅम कॅथा इडुलिस खत, 3 लाख 78 हजार रुपये किमतीचे 18 ग्रॅम 9 मिलीग्रॅम एमडी, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, दुचाकी, तीन मोबाईल, कॅमरुन देशाचा पासपोर्ट असा एकूण 11 लाख 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे (ACP Sunil Tambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते (PI Ashwini Satpute),
सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailaja Jankar),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle),
पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी,
विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, सचिन माळवे,
संदेश काकडे, विशाल शिंदे, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोस्ट ऑफिसात आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आधार कार्ड अपडेट करणार्‍यास अटक