Pune Crime News | हडपसर पोलीस स्टेशन समोर जुन्या गाडीत आढळला मृतदेह, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हडपसर पोलीस स्टेशनच्या (Hadapsar Police Station) समोर असलेल्या पुलजवळ लावण्यात आलेल्या एका वॅगनार गाडीच्या (MH 12 FF 2229) मागील सीटवर एक मृतदेह आढळून आला आहे. ही घटना सोमवारी (दि.6) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. परिसरात दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस स्टेशनच्या समोरील ब्रिजच्या बाजूला लावण्यात आलेल्या एका वॅगनार गाडीच्या मागील सीटवर एक बेवारस पुरुष झोपलेला आढळून आला. गाडीमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती महिला पोलीस शिपाई टाक यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक खळदे व पोलीस हवालदार सकट यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांनी या व्यक्तीला तातडीने खासगी अॅम्ब्युलन्स मधून ससून रुग्णालयात पाठवले. (Pune Crime News)

गाडीत आढळून आलेल्या व्यक्तीला अॅम्ब्युलन्समध्ये ठेवत असताना त्याठीकाणी लोकांची गर्दी जमली होती. या गर्दीमध्ये अमित सतीश कांबळे (वय-20 रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) याने संबंधित व्यक्ती हे त्याचे वडिल असून त्यांचे नाव सतीश प्रभू कांबळे (वय-45) असल्याचे पोलिसांना सांगितले. सतीश यांना दारुचे व्यसन असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ते सतत घर सोडून निघून जातात. ते 15 ऑक्टोबर रोजी घरातून निघून गेल्याचे त्याने सांगितले. (Dead Body Found In Front Of Hadapsar Police Station)

दरम्यान, सतीश कांबळे यांच्या पत्नी सुरेखा कांबळे (वय-36) या त्या ठिकाणी आल्या.
पोलिसांनी गाडीत आढळून आलेल्या सतीश कांबळे व इतरांना अॅम्ब्युलन्स मधून
ससून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले. ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषीत केले.
मृत व्यक्तीचा मुलगा व पत्नी यांनी मृतदेह पाहून त्यांच्या मृत्यू बाबत कोणतेही शंका अथवा संशय व्यक्त केलेला नाही,
अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Illegal Hoardings In Pune | पुणे शहरातील होर्डिंगचे होणार ऑडिट, अनधिकृत होर्डिंगकडून मागील वर्षाची वसुली केली जाणार