Pune Crime News | व्याजासह पैसे घेऊनही आणखी 14 लाखांची मागणी, महिलेसह दोन खासगी सावकारांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील येरवडा येथील नवी खडकी परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेने दोघांकडून प्रति महिना 16 टक्के व्याजदाराने 3 लाख 70 हजार रुपये उसने घेतले होते. या पैशांची व्याजासह परतफेड करुनही आणखी 14 लाखांची खंडणी (Extortion) मागणाऱ्या दोन सावकारांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Squad) एकने अटक केली आहे. (Pune Crime News)

ममता विशाल गोयल (Mamta Vishal Goyal), निलेश उर्फ गोट्या राम बहिरट Nilesh alias Gotya Ram Bahirat (वय-32 रा. बोपखेल गाव, पुणे) अशी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. याबाबत कविता धिरज अगरवाल (वय-30 रा. येरवडा) यांच्या तक्रारीवरुन आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) आयपीसी 384, 385, 504, 506, 34 सह महाराष्ट्र सावकारी अधिनीयम 39 व 45 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ाद यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी ममता गोयल व गोट्या बहिरट
यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपींकडे सावकरी परवाना नसताना फिर्यादी यांना बहिरट यांच्या बँक खात्यातून ऑगस्ट 2022 मध्ये ऑनलाइन 3 लाख 70 हजार रुपये महिना 16 टक्के व्याजाने दिले. फिर्यादी यांनी आजपर्यंत व्याज व मुद्दल असे एकूण 5 लाख 48 हजार 401 रुपये रोख व ऑनलाईन दिले आहेत. (Pune Crime News)

मात्र, त्यानंतरही आरोपी ममता गोयल व गोट्या बहिरट यांनी 14 लाख रुपयांची अवाजवी मागणी केली.
तक्रारदार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने, आरोपी ममता गोयल हिने फिर्यादी यांची चारचाकी गाडी व सहीचा कोरा
चेक जबरदस्तीने घेतला. तसेच त्यांना फोन करुन शिवीगाळ करुन धमकी दिली. आणखी 14 लाख रुपयाची दोघांनी
मागणी केल्याने फिर्यादी यांनी याबाबत खंडणी विरोधी पथक एक कडे तक्रार अर्ज केला. तक्रार अर्जाची चौकशी करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kashmiri Journalist Safina Nabi | काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांचा ‘जर्नालिझम फॉर पीस’ पुरस्कार रद्द; राजकीय दबावाची चर्चा

Pune Crime News | लॉटरी लागल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, स्वारगेट परिसरातील घटना

MLA Ravindra Dhangekar | ससून ड्रग्ज रॅकेटचा तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्या, नार्को टेस्ट करा, काँग्रेस आमदार धंगेकर यांची मागणी

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल; पुण्यातील घटना