MLA Ravindra Dhangekar | ससून ड्रग्ज रॅकेटचा तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्या, नार्को टेस्ट करा, काँग्रेस आमदार धंगेकर यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MLA Ravindra Dhangekar | सध्या ससून ड्रग्ज प्रकरणाने (Sasoon Hospital Drug Racket Case) संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असल्याने आणि सत्ताधारी पक्षांमधील लोकांची नावे चर्चेत येत असल्याने राजकीय धक्के बसत आहेत. त्यातच यातील मुख्य आरोपीने सर्वांची नावे उघड करणार असल्याचे वक्तव्य केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. प्रकरणात राजकीय सहभाग असल्याचे उघड करणारे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी आता केंद्रीय यंत्रणेकडून तपासाची मागणी केली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाचे (Kasba Assembly Constituency) आमदार रवींद्र धंगेकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र पाठवले असून यात मागणी केली आहे की, या पत्रात म्हटले आहे की, ललित पाटील प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण लागत आहे. प्रकरणाची व्याप्ती वाढत जाणार आहे.

काही राजकारणी, पुणे पोलीस (Pune Police) दलातील अधिकाऱ्यांनी पाटीलला मदत केल्याची चर्चा आहे.
राजाश्रय असल्याशिवाय अमली पदार्थाची तस्करी शक्य नाही. पाटील याला ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवून देण्यापासून पळून जाण्यापर्यंत ससून प्रशासन, पोलीस अधिकारी आणि एका मंत्र्याची मदत झाली आहे. (MLA Ravindra Dhangekar)

पत्रात पुढे म्हटले आहे की, राजकीय दबावामुळे पुणे आणि मुंबई पोलीस (Mumbai Police) योग्य प्रकारे तपास करू
शकणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावायचा असेल तर केंद्रीय यंत्रणेकडूनच त्याचा तपास झाला पाहिजे.
तसेच पाटील याची नार्को टेस्टही करावी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बाणेर परिसरातील बंगल्याची परस्पर विक्री करून 21 लाखांची फसवणूक, दोघांवर FIR

IT Raid In Pune | पुण्यातील निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर आयकर विभागाचे छापे

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल; पुण्यातील घटना