Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल; पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. तसेच शारिरीक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दांडेकर पुल परिसरात राहणाऱ्या एकावर पर्वती पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते मार्च 2023 दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) बुधवारी (दि.18) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुशांत अशोक गायकवाड Sushant Ashok Gaikwad (रा. दांडेकर पुल) याच्यावर आयपीसी 376, 376(2)(एन) सह पोक्सो अ‍ॅक्ट, आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला खडकवासला येथे फिरायला नेले.
त्याठिकाणी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
आरोपीने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करुन पडित मुलीची
बदनामी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (PI Vijay Khomne) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची सभा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

Pune Crime News | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक, पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप

IT Raid In Pune | पुण्यातील निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर आयकर विभागाचे छापे

Drug Mafia Lalit Patil | ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना पैसे देऊन मॅनेज केलं, ललित पाटीलच्या चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर