Pune Crime News | 45 हजारांच्या कर्जाचे साडेचार लाख परत करुनही सावकाराची आणखी दीड लाखांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गरजेसाठी ४५ हजार रुपये कर्ज (Loan) घेतले असताना त्याचे साडेचार लाख रुपये परत केल्यानंतरही आणखी दीड लाख रुपयांची मागणी करुन धमकविणार्‍या सावकारावर (Moneylender) पोलिसांनी (Pune Police News) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

सुरज मनोज परदेशी Suraj Manoj Pardeshi (वय ३४, रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज) असे गुन्हा दाखल केलेल्या सावकाराचे नाव आहे. याबाबत शनिवार पेठेतील एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाने विश्रामबाग पोलिसांकडे (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३६/२३) दिली आहे. हा प्रकार ५ जानेवारी २०२० ते २६ जून २०२३ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना होम लोन व मॉरगेज लोनचा व्यवसाय (Home Loan and Mortgage Loan Business) सुरु करायचा होता. (Pune Crime News)

त्यांनी आरोपीकडून दरमहा २० टक्के व्याजाने ४५ हजार रुपये घेतले होते. त्याचा मोबदला म्हणून त्यांनी आरोपीला ४ लाख रुपये ऑनलाईन व ५० हजार रुपये रोख असे साडेचार लाख रुपये दिले. तरीही तो वारंवार फोन करुन घरी येऊन बदनामी करण्याची धमकी देऊन शिवीगाळ करतो. आणखी राहिलेले व्याज व त्यावरील दंड म्हणून १ लाख ८ हजार रुपये व मुद्दल ४५ हजार रुपये असे एकूण १ लाख ५३ हजार रुपयांची मागणी करीत आहे. त्यामुळे शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Despite returning four and a half lakhs of the loan of Rs 45,000, the moneylender demanded another one and a half lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा