Pune Crime News | कोरेगाव पार्कमधील महिलेचे लपून फोटो काढणे गुप्तहेरांना आले अंगाशी; पोलिसांनी सापळा रचून केली अटक

पुणे : Pune Crime News | एक महिला जाते कोठे, करते काय याविषयी त्यांना चौकशीचे काम मिळाले होते. ते गुप्तपणे काम करत होते. परंतु, त्यांची ही हेरगिरी महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर या महिलेचा पाठलाग करुन फोटो काढणार्‍या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. चौकशीत त्यांची गुप्तहेर एजन्सी असून त्यांच्या ग्राहकासाठी काम करीत असल्याचे समोर आले. (Pune Crime News)

पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. निलेश लक्ष्मणसिंग परदेशी Nilesh Laxman Singh Pardeshi (वय २५, रा. वडगाव मावळ) आणि राहुल गुणवंतराव बिरादार Rahul Gunwantrao Biradar (वय ३०, रा. देहुगाव, ता. मावळ) अशी त्यांची नावे आहेत. निलेश परदेशी यांची गुप्तहेर संस्था असून बिरादार हे त्यांचे सहायक आहेत. हा प्रकार १ डिसेबर २०२२ पासून सुरु होता. (Pune Crime News)

याबाबत कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park) राहणार्‍या एका ३२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जेथे जात, तेथे त्यांचा कोणीतरी पाठलाग करुन त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून ते कोणाला तरी पाठवत होते. या महिलेला याचा संशय आला. आपले फोटो काढून त्याचा गैरवापर करतील, सोशल मीडिया अथवा इतर घातपाती कृतीसाठी करण्याची शक्यता असल्याचा संशय आला.

त्यांनी काही दिवसांपूर्वी भरोसा सेल (Bharosa Cell, Pune) तेथे तक्रार केली.
परंतु, त्यावर काही कारवाई झाली नाही. तेव्हा त्यांनी सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) यांची भेट घेतली.
पोलिसांनी या महिलेवर कोण पाळत ठेवत आहे, याचा शोध घेणे सुरु केले.
फिर्यादी महिला या कोरेगाव पार्कमधील ऑर्थर्स थिम हॉटेलमध्ये ७ जानेवारी रोजी गेल्या होत्या.
त्यावेळी दोघे जण लपून लांबून त्यांचे फोटो काढत होते.
फिर्यादी यांच्यावर साध्या वेशात नजर ठेवून असलेल्या पोलिसांना त्यांची कृती संशयास्पद दिसल्याने त्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते एका गुप्तचर संस्थेचे असल्याचे आढळून आले. त्यांना हे काम कोणी दिले याची माहिती ते देत नसून सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Detectives managed to secretly photograph a woman in Koregaon Park; The police laid a trap and arrested him

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mallika Sherawat | मल्लिकाने अंदमान येथील ‘ताज’ हॉटेलमधील बोल्ड फोटो केले शेअर; चाहते झाले घायाळ

Aadhaar Card Security | आधार धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ टिप्स फॉलो करून आधार डाटा ठेवा सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स

Pune Crime News | ‘चिक्या’ भाईला शिव्या दिल्याच्या कारणावरुन दोघा युवकांवर चाकूने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न