Pune Crime News | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या भावाला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | उत्तर प्रदेशाच्या स्पेशल टास्क फोर्स (Special Task Force UP) आणि पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पथकाने संयुक्तरित्या कारवाई करीत नेपाळ बॉर्डरवरील (Nepal Border) गोरखपूर रोड येथील बारा बनकी येथून ससून रूग्णालयातून (Sassoon Hospital) पलायन करणार्‍या ड्रग्स तस्कर (Drug Peddler ) ललित अनिल पाटील (Lalit Anil Patil) याचा भाऊ भूषण अनिल पाटील (Bhushan Anil Patil) आणि साथीदार अभिषेक विलास बलकवडे (Abhishek Vilas Balakwade) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. (Pune Crime News)

दरम्यान, ललित पाटीलने ससून रूग्णालयातून पलायन केल्यानंतर याप्रकरणी ससून रूग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणार्‍या तसेच हलगर्जीपणा करणार्‍या महिला पोलिस उपनिरीक्षकासह 9 पोलिसांना सेवेतून निलंबीत केले आहे. (Pune Crime News)

ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची डझनभराहून अधिक पथके कामाला लागली आहेत. अखेर मंगळवारी गुन्हे शाखेच्या पथकाला ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे याला अटक करण्यात यश आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाला भूषण पाटील आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात यश मिळालं आहे.

अनेक खुलासे होणार

ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलवकडे याच्या अटकेनंतर अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. ललित पाटील याला पलायन करण्यास कोणी-कोणी मदत केली. त्याला कोणत्या पोलिस कर्मचार्‍याने ससून जवळील लॉजमध्ये जाण्यास मुभा दिली. ससून रूग्णालयात तो कोणाच्या मदतीने ड्रग्स रॅकेट चालवत होता. यामधील काही प्रश्नांची उत्तरे भूषण पाटील देवू शकतो. त्यामुळे ड्रग्स रॅकेट प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

ललित पाटीलच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासे होणार

ससूनमधून पलायन करणार्‍या ललित पाटील याच्या अटकेनंतरच मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. ललित पाटीलचा पुणे शहर पोलिसांची गुन्हे शाखा युध्दपातळीवर शोध घेत आहे. ललित पाटीलचा शोध घेत असताना भूषण पाटील जाळयात सापडला असला तरी पोलिसांचं मुख्य टार्गेट ललित पाटील यालाच अटक करणे आहे. पोलिसांची पथके ललित पाटीलच्या मागावर असून त्याला देखील आम्ही लवकरच अटक करू असे पोलिस अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

नाशिकमधील कारखाना उद्ध्वस्त

पोलिसांच्या नाकाखाली हॉस्पिटलमधून ड्रग्ज रॅकेट चालवणारा ड्रग्स माफिया ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन
पळून गेला. या प्रकरणानंतर पोलीस अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
अशातच मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिक शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 300 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले.
पोलिसांनी ही कारवाई करून ड्रग्स बनवणारा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालातून ड्रग्स माफिया ललित पाटील पसार झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली होती.

ड्रग्स माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील हा नाशिकच्या शिंदे पळसे परिसरात ड्रग्सचा कारखाना
चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली.
नाशिकमध्ये गणेशाय इंडस्ट्रीजच्या नावाने हा कारखाना सुरू होता. त्यामध्ये ड्रग्सची निर्मिती केली जात होती.
यावेळी पोलिसांना ड्रग्स बनवण्यासाठी लागणारे तब्बल दीडशे कोटींचे कच्चे साहित्य सापडले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आहे म्हणत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 18 लाखांचा गंडा

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम