Pune Crime News | महिलेचे अंघोळ करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण, एकावर FIR; लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बाथरूममध्ये (Bathroom) अंघोळ करणार्‍या महिलेचे एकाने मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ (Filming in Mobile) काढले. तसेच ते पतीच्या मोबाईलवर पाठवून नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यातील वाडेबोल्हाई येथे घडला आहे. याप्रकरणी (Pune Crime News) एकावर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 35 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) शनिवारी (दि.18) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संभाजी सर्जेराव पवार Sambhaji Sarjerao Pawar (मुळ रा. बोरखेडी, ता. शेणगांव जि. हिंगोली-Hingoli) याच्याविरुद्ध आयपीसी 354 (क) 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.16) सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची पूर्वी भांडण झाले होते.
या भांडणाचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी बाथरुममध्ये अंघोळ करीत असताना चोरुन अश्लील व्हिडिओ (Obscene Videos) आणि फोटो (Photo) काढले.
फोटो आणि व्हिडिओ फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाईलवर पाठवले.
तसेच फिर्यादी यांच्या नातेवाईकांच्या मोबाईल नंबरची यादी पतीला पाठवून व्हिडिओ आणि फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने पतीला पाठवलेले सर्व मेसेज डिलीट केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Filming of woman while taking bath on mobile phone, FIR on one; Incidents in Lonikand area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR

Harmanpreet Broke Rohit Record | हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय