Pune Crime News | फायनान्स कंपनीच्या कलेक्शन मॅनेजरने घातला ३१ लाखांना गंडा; प्रफुल्ल चौधरी याच्याविरुद्ध FIR

पुणे : Pune Crime News | कंपनीने दिलेल्या कर्जाचा थकीत हप्ता व कर्ज प्रकरणे बंद करण्यासाठी वेगवेगळ्या ग्राहकांकडून ३१ लाख ३४ हजार रुपये घेऊन ते कंपनीत न भरता कलेक्शन मॅनेजरने कंपनीला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी बजाज फायनान्स (Bajaj Finance) कंपनीकडून निलेश वावरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६/२३) दिली आहे. त्यानुसार प्रफुल्ल संजय चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाकडेवाडी येथील बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जून २०२२ ते २१ जानेवारी २०२३ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रफुल्ल चौधरी हा फायनान्स कंपनीत कलेक्शन मॅनेजर म्हणून कामाला होता. त्याने ग्राहकांकडून वेळोवेळी थकीत कर्जाचा हप्ता घेतला.
तसेच कर्ज प्रकरण बंद करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या ग्राहकांकडून एकूण ३१ लाख ३४ हजार ९९३ रुपये घेतले.
ग्राहकांना बनावट पावत्या दिल्या. प्रत्यक्षात ही रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा न करता कंपनीची फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Finance company’s collection manager defrauded 31 lakhs; FIR against Prafulla sanjay Chaudhary